ETV Bharat / state

Case of bank fraud : बँकेतील 1 कोटी 29 लाख रुपये फसवणूक प्रकरणी एकास अटक; इतर साथीदारांचा शोध सुरू - search for other accomplices continues in mumbai

बँकेतील (Government Bank of Goregaon West in Mumbai) एक कोटी 29 लाख रुपये ( One Crore 29 Lakhs in Government Bank ) बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीच्या खात्यात वळवले. या फसवणूक प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एक व्यक्तीस अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. परवेज शहा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ( Case of bank fraud )

Case of bank fraud
tबँकच्या फसवणूक प्रकरणी गोरेगाव पोलिसांकडून एकास अटक
author img

By

Published : Dec 15, 2022, 10:11 AM IST

मुंबई : मुंबई उपनगरातील गोरेगाव पश्चिमेकडील एका सरकारी बँकेतील (Government Bank of Goregaon West in Mumbai) एक कोटी 29 लाख रुपये ( One Crore 29 Lakhs in Government Bank ) बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीच्या खात्यात वळवले व ते पैसे विविध खात्यांमध्ये वळवून काढून घेतले. या फसवणूक प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एक व्यक्तीस अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. परवेज शहा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फसवणूक प्रकरणी सायबर सेलकडे एक तक्रार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 मध्ये गोरेगाव मधील एका सरकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी सायबर सेलकडे एक तक्रार झाली होती. या अर्जावरून गोरेगाव पोलिसांनी तपासास सुरुवात केली. बँकेत अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून एक खाते उघडले. ओव्हर ड्राफ्ट खात्यातून मोबाईल बँकिंगचा वापर करून 1 कोटी 29 लाख रुपये काढले गेले. ही सर्व रक्कम चांदिवली, मरोळ, पवई येथील खासगी बँकेच्या खात्यात जमा झाल्याने संशय बळावला. यामुळे बँकेने त्या खात्याची माहिती मागवली. यानंतर सोन बँकांनी माहिती देण्यास नकार दिल्याने ज्या खात्यात रक्कम जमा केली होती ती खाती फ्रिज केली.

खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सुविधा : यानंतर बँकेकडे एक केवायसीसाठी जून महिन्यात अर्ज आला होता. बँकेने त्या खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सुविधा दिली होती. केवायसी अपडेट झाल्यावर त्या खात्यातून 91 लाख रुपये काढून विविध खात्यांत टाकले गेले. तसेच बँकेचे ॲप्स वापरून 38 लाख रुपयेदेखील दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँकेने चौकशी केली. त्या संशयित खातेधारकाचा 2014 मध्ये मृत्यू झाल्याचे उघड झाले.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी : यानंतर बँकेने चौकशी सुरू केली. बँक प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. फसवणूकप्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या मार्फत पुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलीस पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले, त्याची माहिती पोलिसांनी काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परवेझला कुर्ला येथून ताब्यात घेऊन अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.