मुंबई : केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांच्या निधीतून ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभाग यांच्या सहयोगाने ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामीण भागातल्या महिलांच्या विकासासाठी उमेद अभियान राबवले जाते. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना स्वयं सहाय्यता गट स्थापन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना संघटित केले जाते. आणि त्यांचे ग्राम संघ आणि त्यांचे विभाग संघ बांधणी करून त्यांच्या उत्पादित मालाला मुंबई ,नवी मुंबई ,पुणे, नागपूर ,अहमदाबाद बेंगलोर ,दिल्ली, अशा शहरांमध्ये उठाव मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केला जातो.
महिला रोजगारासाठी प्रयत्न: महालक्ष्मी सरस या नावाने हा उपक्रम देशभर राबवला जातो. यंदा 570 बचत गट महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून या सहभागी होणार आहे .आणि 70 बचत गट यापैकी महाराष्ट्र बाहेरून देखील सहभागी होणार आहे .यामध्ये' रेडी टू इट फूड हे स्टॉल' लावले जातील. त्यामुळे शहरातील मध्यमवर्गीय लोकांना चवीचे खाणाऱ्या लोकांना येथे विविध ग्रामीण महिलांनी तयार केलेले पदार्थ खाता येणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच अत्यंत दिमागदार पद्धतीने ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगाराच्यासाठी हा विशेष प्रयत्न 08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने होत आहे.
महिलांसाठी विविध सुविधा: ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत महिलांचे बचत गट सुरू केले जातात. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याच्यातून संसाधन व्यक्ती तयार होतात. विविध प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण प्रकल्प महिलांनी तयार करावे. प्रकल्प अहवाल देखील महिलांनी तयार करावे आणि बँकांकडे त्यांनी जावे .आणि बँकांकडून कर्ज घ्यावे आणि स्वतः उद्योजक म्हणून त्या नावारूपाला याव्यात या पद्धतीचा प्रयत्न यातून केला जातो. कोरोना महामारीमुळे हे काम थंडावले होते. मात्र आता तब्बल दोन वर्षांनी पुन्हा महालक्ष्मी सरस हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या जीवन उन्नतीसाठी राबवला जात आहे .आणि या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करणार आहेत.
क्षमता वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न: या संदर्भातले राज्याचे प्रकल्प कार्यकारी अधिकारी परशुराम राऊत यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना म्हटले आहे , की ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन मिळून संयुक्त सहाय्यक निधी मिळतो. त्याद्वारे महाराष्ट्रातील ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभाग संयुक्त यामध्ये कार्यरत आहे .ग्रामीण महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाते त्यांची क्षमता वृद्धिंगत केली जाते .आणि बचत गट द्वारे त्यांच्या वस्तूंना मालांना बाजारामध्ये बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले जाते. यातून त्या आपल्या कुटुंबासह गावच्या विकासाला देखील हातभार लावतात .आणि यंदा दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात 570 बचत गट नवी मुंबई या ठिकाणी येत आहेत. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन करणार आहेत."
भरडधान्यांच्या पदार्थाचे स्वतंत्र स्टॉल: ग्रामीण महाराष्ट्र मध्ये ज्वारी बाजरी कडधान्य आणि नाचणी याचे विशिष्ट पदार्थ तयार केले जातात. जे महिलांना आणि एकूणच कुटुंबाला पौष्टिक पदार्थ त्यातून उपलब्ध होतात . यावर विशेष भर या वेळेला बचत गटाच्या महिलांनी दिलेला आहे. "कारण हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून घोषित केलेले आहे. ज्याला इंग्रजीमध्ये मिलेट असं म्हटलं जातं. या अशा भरड धान्यातून विविध प्रकारचे पदार्थ ग्रामीण महिलांच्या बचत गटांनी तयार केलेले आहे. आणि शहरातील मध्यमवर्गी जनतेला अनोख्या अस्सल गावच्या ढंगाचे चवीचे पदार्थ यंदा नवी मुंबई येथे खायला मिळणार आहे. याचे कारण दरवर्षी हे मुंबईमध्ये भरत होते परंतु यावर्षी मुंबईची जागा उपलब्ध नसल्यामुळे नवी मुंबईच्या विशाल पटांगणावर हे प्रदर्शन आणि स्टॉल भरवले जात आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सर्वार्थाने सक्षम करणारा हा कार्यक्रम असल्याचे यासंदर्भातल्या बचत गटातील प्रमुख महिला अनिता माने यांनी ईटीवीभारत सोबत संवाद साधताना वरील प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: Obscene MMS Threats : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिला व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी