ETV Bharat / state

Andheri East Bypoll: नोटाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना महिलांनी पकडले; पाहा एक्सक्लुजीव रिपोर्ट

अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केला. दरम्यान, या कार्यकर्त्यांना ठाकरे गटातील महिलांनी पकडले अन् पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर हे लोक भाजपचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहेत. (Andheri East Bypoll) ही घटना अंधेरी साईवाडा परिसरात घडली आहे. या परिसरात तणाव निर्माण झाला असून येथे पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

author img

By

Published : Nov 3, 2022, 6:54 PM IST

Updated : Nov 3, 2022, 7:41 PM IST

ईटीव्ही भारतचा एक्सक्लुजीव रिपोर्ट
ईटीव्ही भारतचा एक्सक्लुजीव रिपोर्ट

मुंबई - अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केला. दरम्यान, या कार्यकर्त्यांना ठाकरे गटातील महिलांनी पकडले अन् पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर हे लोक भाजपचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहेत. ही घटना अंधेरी साईवाडा परिसरात घडली आहे. (polling By Andheri East Election) या परिसरात तणाव निर्माण झाला असून येथे पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर आज पोटनिवडणुकीच्या मतदान होत आहे. या मतदानाला दिवसभर अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. दिवसभरात अंदाजे साधारण 30 टक्के मतदान झाले. मात्र, अगदी शेवटी शेवटी या मतदान प्रक्रियेत वाद झाला तो म्हणजे भाजप कार्यकर्त्यांकडून नोटाचा प्रचार होत असल्याचा आरोप आता शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. या भाजपच्या कार्यकर्त्यांना महिलांनी समजलेला असून पोलिसांकडे देखील या संदर्भात माहिती दिली आहे.

ईटीव्ही भारतचा एक्सक्लुजीव रिपोर्ट

शिवसेनेच्या महिला जात होत्या घरोघरी - या संदर्भात ईटीव्ही'शी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मनिषा पांचाळ म्हणाल्या की, "आम्ही आमच्या प्रभागातील पोलिंग बूथवर दिवसभर फेऱ्या मारतोय. लोकांना आवाहन करतोय की, त्यांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. प्रत्येकाला आपले मतदान करण्याचा हक्क आहे. तो त्यांनी बजवावा यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना आवाहन करत होतो. मात्र, घरोघरी फिरताना आमच्या काही महिला कार्यकर्त्यांना भाजपचे काही कार्यकर्ते लोकांच्या घरी जाऊन नोटाला मतदान करा असे सांगताना आढळले." असा आरोप या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.

नोटाच्या एका मतामागे हजार रुपये - पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "सुरुवातीला आम्ही त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते काही आमच्या तावडेत सापडले नाहीत. मात्र, नंतर जेव्हा आम्ही साईवाडी या परिसरात आलो तेव्हा जवळच असलेल्या साई मंदिराच्या परिसरात ही लोक बसली होती. आम्ही त्यांना रंगेहात पकडलं. यावेळी या कार्यकर्त्यांकडे आम्हाला अनेक फायली, काही कागद मिळाले. या पेपर्समध्ये त्या भागात राहणाऱ्या मतदारांची नावे होती. त्यासमोर त्यांची संपर्क क्रमांक होते. तसेच ज्या लोकांनी नोटाला मतदान केलं आहे अशा लोकांच्या नावासमोर टिकमार्क करण्यात आली आहे. या टिकमार्कचा अर्थ असा की, या लोकांनी नोटाला मतदान केलं आहे आणि या लोकांना हजार रुपये देणे आहे. एका मता मागं या लोकांनी हजार रुपये दिले आहेत." असा थेट आरोप शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्यांनी ईट विभागाची बोलताना केला आहे.

साईवाडी मंदिर परिसर - याबाबत आणखी माहिती देताना माजी नगरसेविका पांचाळ सांगतात की, "या सर्व प्रकाराची माहिती आम्ही पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी त्यांना फक्त समज दिला. खरंतर सुरुवातीला हा सर्व प्रकार आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही या लोकांना तात्काळ समज दिला होता. मात्र, समोरच्याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी 100 नंबरला फोन करून आमच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आम्हाला संपर्क साधला आमची भेट घेतली आणि चौकशी केली. मात्र, इथे घडलेली हकीकत आम्ही पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या साईवाडी मंदिराच्या परिसरात थोडी शोधाशोध केली त्यांना देखील इथे अनेक फाईल मिळाल्या. आता पोलीस म्हणतात की, हे सर्व प्रकरण तुम्ही निवडणूक आयोगाकडे न्या. आता उद्या जर काही मतांमध्ये फरक आढळल्यास यावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार? कायभूमिका घेणार?" असा सवाल देखील या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

Last Updated : Nov 3, 2022, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.