मुंबई : मला विचारतात लोक फक्त तुमच्या सभेला येतात ते मतदान करत नाहीत. मात्र, त्या-त्या वेळीच्या त्या घटना असतात. मात्र, आम्हाला तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न इतरांना तुम्ही विचारणार नाही हे वास्तव आहे. (Raj Thackeray Speech) त्यावर एक पत्रकारही इतरांना प्रश्न विचारत नाही. देशावर काँग्रेसने सुमारे 60 वर्ष राज्य केले त्या पक्षाची अवस्ता बघा असे म्हणत राज यांनी हे दिवस येत असतात असही राज यावेळी म्हणाले आहेत. तसेच, हेही मळभ दूर होईल असे म्हणत आम्ही लवकरच सत्तेत येऊ असा आशावाद व्यक्त केला आहे.
माझ्या मुलांचे रक्त असे मी वाया जावू देणार नाही : संदिप देशपांडेंवर ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी मी काही बोललो नाही. त्यावेळी हे कुणी केले असेल अस मला विचारण्यात आले. मात्र, तुम्हाला सांगतो हे जे कुणी केले आहे ते सर्वात अगोदर त्यांनाच कळेल आणि नंतर बाकीच्यांना कळेल असे म्हणत माझ्या मुलांचे रक्त असे मी वाया जावू देणार नाही असा थेट ईशारा राज यांनी यावेळी दिला आहे.
कामाचा लेखाजोखा : गेल्या 17 वर्षात आम्ही काय केले आणि वारंवार आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केले. त्याचे पहिले डिजीटल पुस्तक आम्ही आज प्रकाशित करत आहोत असे म्हणत आजपर्यंत आम्ही जेवडे आंदोलन केले तेव्हडे कुणीही केलेले नाहीत असा दावाही राज यांनी यावेळी केला आहे.
लोकांना नक्की काय हव असत : कामाची पुस्तीका प्रकाशित झाल्यानंतर नाशिकचा विषय आला तेव्हा राज ठाकरे यांनी नाशिक येथील विकासाबद्दल उल्लेख केला आणि लोकांबद्दल नाराजी व्यक्त केली. लोकांना नक्की काय हव असत असे म्हणत इतका विकास करूनही लोक ऐन वेळी दुसऱ्यांनाच मतदान करतात अशी खंत व्यक्त केली.
ती काढली असती तरी पाहिली असती : ब्लूव प्रिंट पक्षाने दिली मात्र ती कुणी वाचत नाही याची खंत बोलून दाखवताना राज यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा पत्रकाराने मला विचारले तुमची ब्लूव फिल्म कधी येणार आहे. यावर साला ती काढली असती तरी पाहिली असती, ही कुणी वाचत नाही असे म्हणत राज यांनी यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, हा किस्सा सांगितला तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.
त्या दिवशी खरा विकास : ज्या माहाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्रात आज जे काही राजकारण सुरू आहे. ते कधीच पाहिले नाही. हे सगळ प्रचंड गलिच्छ पातळीवर गेले आहे. ज्या दिवशी हे गलिच्छ राजकारण बंद होईल त्या दिवशी खरा महाराष्ट्र सुखी होईल. त्या दिवशी खरा विकास होईल. असे म्हणत राज ठाकरे यांनी आजच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. याचवेळी मला जे काही कुणाचे वाभाडे काढायचे आहेत आणि कुणाला फाडायचे आहे ते 22 मार्च गुढीपाडव्याला काढणार असे म्हणत काही गोष्टी त्यांनी राखूनही ठेवल्या आहेत.
हेही वाचा : Maha Budget 2023 : अर्थसंकल्पात सिंचनासाठी 'या' नव्या योजनांची घोषणा; जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू