ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठात मागील आठ वर्षापासून ऑनलाईन प्रवेशाचा फार्स, संस्थाचालकांचे हित जपण्याचा प्रयत्न

मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे. यात केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश मात्र संबंधित महाविद्यालयांकडेच केले जाते. त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारानुसार अनेक महाविद्यालये प्रवेश देताना अमाप शुल्क वसुली करतात. तर कधी राखीव जागांवर प्रवेश डावलले जात असते. असे असताना त्याकडे विद्यापीठ प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने का केली जात नाही, असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.

मुंबई विद्यापीठात मागील आठ वर्षापासून ऑनलाईन प्रवेशाचा फार्स
author img

By

Published : May 30, 2019, 9:23 AM IST

मुंबई - मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात लागू झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांनी प्रत्येक महाविद्यालयातील प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाने संस्थाचालकांचे हित जपण्यासाठी मागील ८ वर्षांपासून पदवी, पदव्युत्तर आदीच्या प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन नोंदणीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे. याविषयी विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कायदा अंमलात येऊनही विद्यापीठ आपल्याकडे संपूर्ण प्रवेश का राबवत नाही, असा सवाल केला जात आहे.

मुंबई विद्यापीठात मागील आठ वर्षापासून ऑनलाईन प्रवेशाचा फार्स

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ७९३ वरिष्ठ महाविद्यालये असून यात २६ महाविद्यालयांनी स्वायत्तता घेतली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ३ लाख ३९ हजार ४५५ प्रवेशासाठीच्या जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशसाठी विद्यापीठाकडून ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे. यात केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश मात्र संबंधित महाविद्यालयांकडेच केले जाते. त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारानुसार अनेक महाविद्यालये प्रवेश देताना अमाप शुल्क वसुली करतात. तर कधी राखीव जागांवर प्रवेश डावलले जात असते. असे असताना त्याकडे विद्यापीठ प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने का केली जात नाही, असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.

या विषयासाठी घेतले जातात प्रवेश

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठात प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी, बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए, इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी, बीएमएस, बीएमएस-एमबीए, बीकॉम, फायनान्शिअल मार्केट, अकाउंन्टींग, बँकिंग अँड इन्शुअरन्स, मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीएस्सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, हॉस्पीटॅलिटी स्टडी, मायक्रोबायोलॉजी, बायो-केमेस्ट्री, मेरिटाईम, नॉटीकल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, होम सायन्स, एरॉनॉटिक्स, एव्हीएशन, बीएस्सी न हाऊस मॅनेजमेंट, फार्मा अॅनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि लायब्ररी सायन्स आदी विषयासाठी प्रवेश घेतले जातात.

ऑनलाईन नोंदणीसाठी विद्यापीठाने http://mum.digitaluniversity.ac/ ही लिंक दिली आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी पहिल्यांदाच विद्यापीठाने ०२०६६८३४८२१ या हेल्पलाईनवर आणि विद्यार्थ्यांना चॅटींगचा नवीन पर्याय दिला आहे. त्यावर हवी ती माहिती विद्यार्थ्यांना तत्काळ मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव लिलाधर बन्सोड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून मागील २०११ पासून केवळ ऑनलाईन नोंदणी प्रकिया सुरू आहे. त्यात नवीन विद्यापीठ कायद्यानुसार बदल होणे आवश्यक आहे. मात्र संस्थाचालकांचे हित जपण्यासाठी विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीने प्रवेश केलेले नाहीत. इतर अनेक विद्यापीठांनी हे प्रवेश सुरू केलेले असताना त्यात मुंबई विद्यापीठ कोणाच्या दबावाखाली काम करते हे समोर आले पाहिजे, असे मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी म्हटले.

अशा आहेत प्रवेशासाठीच्या जागा

कला ६० हजार ०२८
वाणिज्य १ लाख ६८ हजार ३४८
फाईन आर्ट ५२०
विधी १० हजार ७४०
विज्ञान ६८ हजार ९४०
तंत्रज्ञान ३० हजार ८७९

एकूण ३ लाख ३९ हजार ४५५

Intro:
आठ वर्षानंतरही विद्यापीठाची प्रवेशसाठी केवळ ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया; Body:आठ वर्षानंतरही विद्यापीठाची प्रवेशसाठी केवळ ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया;
प्रवेशासाठी यंदाही महाविद्यालयांना मोकाट रान
(यासाठी 3g live 07 वरून बन्सोड यांचा बाईट पाठवला आहे तोही घ्यावा, सोबत संतोष गांगुर्डे यांचा बाईट जोडत आहे)

मुंबई, ता. 29 : मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात लागू झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांनी प्रत्येक महाविद्यालयातील प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे, मात्र मुंबई विद्यापीठाने संस्थाचालकांचे हीत जपण्यासाठी मागील आठ वर्षांपासून पदवी, पदव्यूत्तर आदीच्या प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन नोंदणीपर्यंतच मर्यादित ठेवले असून याविषयी विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कायदा अंमलात येऊनही विद्यापीठ आपल्याकडे संपूर्ण प्रवेश का राबवत नाही, असा सवाल केला जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 793 वरिष्ठ महाविद्यालये असून यात 26 महाविद्यालयांनी स्वायत्तता घेतली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 3 लाख 39 हजार,455 प्रवेशासाठीच्या जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशसाठी आज विद्यापीठाकडून ऑनलाईन नोंदणीला सुरूवात केली आहे. यात केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश मात्र संबंधित महाविद्यालयांकडेच केले जाते. त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारानुसार अनेक महाविद्यालये प्रवेश देताना अमाप शुल्क वसुली करतात, तर कधी राखीव जागांवर प्रवेश डावलले जात असताना त्याकडे विद्यापीठ प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याने संपूण प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने का केली जात नाही, असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.
--
या विषयासाठी केले जातात प्रवेश
शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए फ्रेंच स्टडी,जर्मन स्टडी, बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए, इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी, बीएमएस, बीएमएस-एमबीए बीकॉम फायनान्शिअल मार्केट, अकॉउन्टींग, बँकिंग अँड इन्शुअरन्स, मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीएस्सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,कम्प्युटर सायन्स,हॉस्पीटॅलिटी स्टडी,मायक्रोबायोलॉजी, बायो-केमेस्ट्री,मेरिटाईम,नॉटीकल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स,होम सायन्स,एरॉनॉटिक्स),एव्हीएशन), बीएस्सी न हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स आदी.
---
बाईट, लिलाधर बन्सोड, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ
ऑनलाईन नोंदणीसाठी विद्यापीठाने http://mum.digitaluniversity.ac/ या लिंक दिली असून त्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पहिल्यांदाच विद्यापीठाने 02066834821 या हेल्पलाईनवर आणि विद्यार्थ्यांना चॅटींगचा नवीन पर्याय दिला असून त्यावर हवी ती माहिती विद्यार्थ्यांना तात्काळ मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव लिलाधर बन्सोड यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
---
बाईट,
प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून मागील 2011 पासून केवळ ऑनलाईन नोंदणी प्रकिया सुरू आहे, त्यात नवीन विद्यापीठ कायद्यानुसार बदल होणे आवश्यक आहे, मात्र संस्थाचालकांचे हित जपण्यासाठी विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीने प्रवेश केलेले नाहीत. इतर अनेक विद्यापीठांनी हे प्रवेश सुरू केलेले असताना त्यात मुंबई विद्यापीठ कोणाच्या दबावाखाली काम करते हे समोर आले पाहिजे.
- संतोष गांगुर्डे, उपाध्यक्ष, मनविसे
--
अशा आहेत प्रवेशासाठीच्या जागा
कला 60028
वाणिज्य 168348
फाईन आर्ट         520
विधी          10740
विज्ञान          68940
तंत्रज्ञान          30879
एकुण 3 लाख 39 हजार,455
Conclusion:
आठ वर्षानंतरही विद्यापीठाची प्रवेशसाठी केवळ ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया;
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.