ETV Bharat / state

'हा' शिवसैनिक दिसणार लोकसभेच्या रणधुमाळीत, परदेशात म्हणतात 'मुंबईचा वाघ'

शिवसेनेने मुंबई व राज्यभरातून विभिन्न वयोगटातील २२ स्टार प्रचारक नेमले आहेत. शिवसेनेने नेमलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत धीरजचेही नाव आहे.

शिवसेना कार्यकर्ता
author img

By

Published : Mar 13, 2019, 7:14 PM IST

मुंबई - आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत उमेदवार निश्चित करण्यापासून ते पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. यातच शिवसेनेतही प्रचाराची रणनिती आखली जात आहे. शिवसेनेच्या या प्रचाराच्या रणधुमाळीसाठी मूळचा मुंबईचा असलेला मात्र ब्राझीलला स्थायिक झालेला मराठी शिवसैनिक धावून आला आहे. धीरज मोरे, असे या शिवसैनिकाचे नाव आहे.

शिवसेना कार्यकर्ता

धीरज मोरे यंदा शिवसेनेसाठी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. मागच्या २० वर्षापासून धीरज ब्राझील येथे स्थायिक झाला आहे. चीन व ब्राझील येथे त्याचा व्यवसाय आहे. मुंबईत कॉलेजमध्ये असताना एकदाच बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली होती. शिवसेनेने त्यांना ना नोकरी दिली ना पद दिलं फक्त भीड म्हणण्याची ताकद. या ताकदीच्या बळावरच ते परदेशातही मराठी बाणा जपत असल्याचे तो म्हणतो. परदेशात गाड्यांवर स्टिकर लावणं कायदेशीर गुन्हा असतानाही ते दंड भरून गाडीवर शिवसेनेच्या वाघाचं चित्र व शिवसेनेची गाणी वाजवत फिरतात. यामुळे त्यांना परदेशात मुंबईचा वाघ म्हणून ओळखले जाते.

Intro:परदेशी शिवसैनिक प्रचाराच्या रिंगणात
मुंबई - रविवारी आचारसंहिता लागू झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांत उमेदवार निश्चित करण्यापासून ते पक्षांतराचे वारे वाहू लागलेत. तर शिवसेनेतही प्रचाराची रणनिती आखली जातेय. शिवसेनेच्या या प्रचाराच्या रणधुमाळीसाठी मूळचा मुंबईचा असलेला मात्र ब्राझीलला स्थायिक झालेला मराठी शिवसैनिक धावून आलाय. धीरज मोरे असे या शिवसैनिकाचे नाव आहे.
परदेशात मुंबईचा वाघ म्हणून ओळख असलेले धीरज मोरे यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात
उतरणार आहेत.

Body:
1998 पासून धीरज ब्राझील येथे स्थायिक असून चीन व ब्राझील येथे त्यांचा व्यवसाय आहे. मुंबईत कॉलेजमध्ये असताना एकदाच बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली. शिवसेनेने त्यांना ना नोकरी दिली ना पद, दिले फक्त भीड म्हणण्याची ताकद. या ताकदीच्या बळावरच ते परदेशातही मराठी बाणा जपतात. परदेशात गाड्यांवर स्टिकर लावणं कायदेशीर गुन्हा असतानाही ते दंड भरून गाडीवर शिवसेनेच्या वाघाचं चित्र व शिवसेनेची गाणी वाजवत फिरतात. यामुळे त्यांना परदेशात मुंबईचा वाघ म्हणून ओळखले जाते.,

Conclusion: शिवसेनेने मुंबई व राज्यभरातून विभिन्न वयोगटातील 22 स्टार प्रचारक नेमलेत. शिवसेनेने नेमलेल्या स्टार प्रचारक यांच्यासोबतच परदेशात मुंबईचा वाघ म्हणून ओळख असलेला प्रचारक या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.