ETV Bharat / state

Discount On Mumbai Metro Travel: खुशखबर! आता 'या' प्रवाश्यांना 1 मे पासून मुंबई मेट्रोच्या प्रवासात सवलत

एसटी महामंडळात महिलांना बस प्रवासात सवलत दिल्यानंतर राज्य शासनाने आता मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यां​ना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे​ रोजी म्हणजेच​ 'महाराष्ट्र दिना'पासून​ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 'मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' वापरणाऱ्यांना सवल​तीला लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Discount On Mumbai Metro Travel
मुंबई मेट्रोच्या प्रवासात सवलत
author img

By

Published : Apr 29, 2023, 9:10 PM IST

मुंबई: राज्यात निवडणुका तोंडावर असल्याने शासनाकडून जनतेला सवलती दिल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी 'मुंबई-1 पास' दिली जाणार आहे. शासनाकडून ही 'महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड' आणि 'एमएमआरडीए'​तर्फे महाराष्ट्र दिनाची भेट असेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सवलतींबाबत काय म्हणाले शिंदे? ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग​, ​लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात ​घेता प्रशासनाने 'मुंबई मेट्रो नेटवर्क' तयार केले आहे​. या सुविधांचा​ त्यांना​ जास्तीत जास्त ​लाभ मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना​ यापूर्वी​ एसटी​चा मोफत प्रवास ​आणि​ महिलांना ५० टक्के प्रवास सवलती​ दिल्या आहेत. मेट्रो प्रवासातील सवल​​ती​ याच भावनेतून आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

​​

अशी असेल ​सवलत: ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी ​ही सवलत असेल. 'श्रेणी​ तीन'मधील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी ​लागतील. दिव्यांगांसाठी सरकारी​, ​वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन​कार्ड,​ शाळा ओळखपत्र​ सोबत असावे लागले.

असा मिळेल लाभ: 'मेट्रो लाइन २ ए' आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागद​पत्रांवर सवलती मिळतील. एकाच कार्डवर ​सवलत देण्याची योजना आहे. त्यासाठी ३० दिवसांची ​मुदत असेल. मुंबई एक कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासा​तही वापरण्यास अनुमती असणार आहे. त्याला रिचार्ज​ करण्याची सुविधा असेल.

सिने कलाकारांचा मेट्रोने प्रवास: केवळ सामान्यच नव्हे तर सिने कलावंतही मेट्रोच्या प्रवासाला पसंती देतात. वरुण, कियारा, अनिल कपूर यांनी मुंबईच्या मेट्रोतून प्रवास करुन प्रवाशांना चकित केले होते. त्यांचा व्हिडिओ प्रसिध्द झाला असून यात ते मेट्रोच्या आत वडापावचा आस्वाद घेताना दिसत होते. हेमा मालिनी यांनी 12 एप्रिल, 2023 रोजी सोशल मीडियावर त्यांच्या मेट्रो प्रवासाची एक झलक शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कारने मुंबईच्या उपनगरातील दहिसरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दोन तास लागले. त्यामुळे त्यांनी कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि वेळेवर पोहोचल्या. मेट्रोची पहिली पोस्ट शेअर करताना हेमा मालिनी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा अनोखा, अद्भुत अनुभव मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केला पाहिजे. गाडीने दहिसरला पोहोचण्यासाठी २ तासांचा प्रवास केला, त्यामुळे दमछाक झाली. त्यानंतर मी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ओएमजी! किती आनंददायी होता. स्वच्छ आणि जलद मेट्रोने १/२ तासात जुहूला पोहोचले.

हेही वाचा: Anand Mohan: आनंद मोहनच्या तुरुंगातील सुटकेला विरोध! जी कृष्णय्या यांच्या पत्नीची सुप्रिम कोर्टात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.