मुंबई- बाजारांमध्ये हँड सॅनिटायझरचा तुटवडा तसेच काळाबाजर होणार नाही, असे राज्य शासनाकडून आश्वासित करण्यात आले होते. मात्र, शहरात काही वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. शहरातील बऱ्याच परिसरांमध्ये रस्त्यावर मास्क विक्री होताना दिसून आले आहे. विशेष म्हणजे, हे मास्क प्रमाणित नसूनही नागरिकांकडून ते विकत घेतले जात आहेत.
हँड सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात शासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, शहरातील बऱ्याच परिसरांमध्ये रस्त्यावर उघडपणे मास्क विक्री केले जात असल्याचे दिसून आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर रस्त्यावर प्रमाणित नसलेले कापडी मास्क विकले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास २० रुपयांना एक मास्क विकला जात असून, मुंबईकर असे मास्क विकत घेतानाही पाहायला मिळत आहेत. हे मास्क खात्री न करता किंवा ते किती सुरक्षित आहेत, याची पडताळणी न करताच नागरिक हे मास्क विकत घेत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
हेही वाचा- 'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची खात्री केली जात आहे; आरोग्य मंत्र्यांची माहिती