मुंबई - गणेशोत्सव म्हटला की उत्साह, ढोल-ताशे, लाऊडस्पीकर, डीजे, फटाक्यांची आतषबाजी सगळं कसं साग्रसंगीत. त्यातही गणेश विसर्जन मिरवणुकीत हा उत्साह अधिक वाढतो. त्यामुळे साहजिकच दरवर्षी दीड दिवसांच्या गणपतीपासून ते 11 दिवसांच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनापर्यंत मिरवणुकीची धामधूम काही औरच असते. तर त्याचवेळी मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणावर यामुळे वाढते. मात्र, यंदा पहिल्यांदाच मुंबईत ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्यांदाच केवळ एक विभाग वगळता सर्वत्र 100 डेसिबलच्या आत आवाजाची पातळी नोंदवली गेली आहे. यावर आवाज फाऊंडेशनने समाधान व्यक्त करतानाच मुंबईकरांचे कौतुकही केले आहे. तर यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही आभार मानले आहेत.
मुंबईत पहिल्यांदाच ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात बाप्पाचे विसर्जन; 53 ते 100.7 डेसीबलपर्यंत आवाजाची नोंद
मुंबईत 53 ते 100.7 डेसीबल इतकी आवाजाची नोंद झाली आहे. त्यानुसार सर्वाधिक आवाजाची पातळी वरळी डेअरी येथे नोंदवली गेली आहे. येथेच काही प्रमाणात ढोल ताशे वाजवण्यात आल्याचे दिसून आले. 100.7 डेसीबल इतके येथे ध्वनीप्रदूषण होते. तर सर्वात कमी 53.1 डेसीबलची नोंद शिवाजी पार्क येथे झाली आहे.