ETV Bharat / state

Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही - अजित पवार

author img

By

Published : Jan 4, 2023, 2:19 PM IST

Updated : Jan 4, 2023, 4:04 PM IST

मागीलवर्षी मार्चमध्ये अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रुपये तसेच महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ इतर उपक्रम राबवण्याची घोषणा केली होती. याची आठवण अजित पवारांनी करुन दिली. त्यामुळे संभाजी महाराजांबद्दल अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार
अजित पवार
अजित पवार यांची पत्रकार परिषद

मुंबई - संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रुपये तसेच महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ इतर उपक्रम राबवण्याची घोषणा मागीलवर्षी मार्चमध्ये अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर केली होती. याची आठवण अजित पवारांनी करुन दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजीनामा मागण्याचा अधिकार नाही - मी कधीच महापुरुषांबद्दल चुकीचे बोललेलो नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचवेळी भाजपला आपल्या विरोधात वक्तव्य करुन राजीनामा मागण्याचा अधिकार नाही असेही पवारांनी भाजपला सुनावले. अजित पवार यांना यावेळी राज्यपाल तसेच मंत्री आणि आमदारांनी कोणकोणती वक्तव्ये केली, याचीही माहिती दिली.

राज्यपाल, आमदारांची बेताल वक्तव्ये - अजित पवार यांनी राज्यातील मंत्री, राज्यपाल, आमदार अनेकदा बेताल वक्तव्ये करत आहेत. तसेच महापुरुषांचा अपमान करत आहेत. त्यांनी खरे तर माफी मागायला पाहिजे असे अजित पवार यावेळी म्हणाले. महाराजांच्याबद्दल काही चुकीचे बोललो नाही. महाराजांच्याबद्दल कुठेही अपशब्द वापरले नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होतो अजित पवार? - हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते, असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. तसेच भारतीय जनता पक्षाने तर राज्यभर अजित पवार यांच्या विरोधात निषेध नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. गेले चार ते पाच दिवस याबाबत महाराष्ट्रात राजकारण तापल असताना, यावर अजित पवार यांनी मात्र तकार शब्दही काढला नव्हता.

अजित पवारांचे स्पष्टीकरण - मात्र, आज त्यांनी केलेल्या वक्तव्या बाबत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल आहे. आपण छत्रपती संभाजी राजे यांच्या बाबत कोणतेही चुकीचे विधान केलेला नाही. आपण आपल्या विधानावर ठाम आहोत. आपण इतिहासकार नाही, मात्र आजपर्यंत आपण त्याचा अभ्यास केला आपल्या वाचनात जे आलं त्यावरून छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षकच होते हीच पदवी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत सर्वसमावेशक आहे. कारण स्वराज्य रक्षक या शब्दांमध्ये धर्म, संस्कृती, रक्षण असे सर्वच आलं आहे असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षकच - तसेच आपण छत्रपती संभाजी राजे यांच्या बाबत तिथे विधान केलेले नाही. आपण केलेल्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाला आपला राजीनामा मागण्याचा अधिकारही नाही असा टोलाही अजित पवार यांनी मुंबईत विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे. धर्मवीर उपाधी या आधी अनेकांना मिळाली. अनेक जण धर्मवीर म्हणून घेतात. धर्मवीर नावाने सिनेमा देखील आला होता. आता तर पार्ट टू देखील येतोय. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य याचं रक्षण छत्रपती संभाजी राजे यांनी केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षकच आहेत हे आपलं मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी राजे यांना कोणी धर्मरक्षक म्हणत असेल तसेच कोणी स्वराज्य रक्षक म्हणत असेल यात काही वावगं नाही असं, म्हटलं आहे. या मताशी आपण सहमत असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

आपल्या विरोधात षडयंत्र - अधिवेशनात असताना आपण छत्रपती संभाजी राजे यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गटाचे नेते समोर उपस्थित होते. मात्र अधिवेशन झाल्यानंतर दोन दिवसानंतर केवळ राजकीय हेतूमुळे आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून आपल्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या काही शिवसेनेने जाणून बुजून आपल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना आंदोलनाची रूपरेषा ठरवून दिली. आपल्या विरोधात आंदोलन करायला जबरदस्तीने सांगण्यात आले स्वतः भारतीय जनता पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला फोन द्वारे ही माहिती दिली असल्याचा दावा अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेतून केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये संभाजी राजांच्या स्मारकाला निधी - माविकास आघाडी सरकार असताना 2022 यासाठी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा आपण छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मारकासाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद केली. वळू बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे येथे हे स्मारक करण्यासाठी हा निधी देण्यात आला होता. नवीन सरकार आल्यानंतर देखील त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा स्मारक योजना चांगली असल्याचं म्हणत हे स्मारक पूर्ण करण्याचा दावा केला होता याची आठवणही या पत्रकार परिषदेतून अजित पवार यांनी करून दिली.

Last Updated : Jan 4, 2023, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.