मुंबई- राज्य पोलीस दलासाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 48 तासांत राज्य पोलीस दलात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. मात्र, कोरोनाग्रस्त 34 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1 हजार 431 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 195 पोलीस अधिकारी, तर 1 हजार 236 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोविड 19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 958 हून अधिक कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत, तर अवैध वाहतुकीच्या 1 हजार 332 प्रकरणात 23 हजार 915 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 हजार 556 वाहन जप्त करण्यात आली आहेत, तर तब्बल 6 कोटी 79 लाख 81 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 47 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.
हेही वाचा- लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन