ETV Bharat / state

Nilesh Rane Retirement : निलेश राणे यांची अचानक राजकारणातून निवृत्तीची घोषणा; 'हे' सांगितलं कारण - आमदार निलेश राणे न्यूज

Nilesh Rane Retirement : भाजपा नेते निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर या निवृत्तीमागील कारणदेखील स्पष्ट केलंय. या निर्णयामुळं राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nilesh Rane retirement
Nilesh Rane retirement
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 1:08 PM IST

Updated : Oct 24, 2023, 4:07 PM IST

मुंबई : Nilesh Rane Retirement : भाजपा नेते आणि राजापूर मतदारसंघाचे माजी खासदार निलेश यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९-२० वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.

निलेश राणे यांचा राजकीय प्रवास : निलेश राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर बेधडक मतप्रदर्शन करण्याच्या सवयीमुळे त्यांना अनेकदा टीकचं लक्ष्यही व्हावं लागलं. निलेश राणे हे १५ व्या लोकसभेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. मात्र २०१४ साली झालेल्या १६ व्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यांचे धाकटे बंधु नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. निलेश आणि नितेश या दोन्ही भावंडांची राजकीय जडणघडण त्यांचे वडील विद्यमान केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या तालमीत झाली. निलेश राणे हे यशस्वी उद्योजकही आहेत.

  • नमस्कार,

    मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

    मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…

    — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आताच्या घडीला राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९ ते २० वर्षात आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. नेहमी माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपा खूप प्रेम भेटलं आणि भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशिबवान आहे - निलेश राणे, माजी खासदार

निवडणूक लढवण्यात कुठलाच रस नाही - निलेश राणे पुढे म्हणाले की, मी एक लहान माणूस आहे. परंतु राजकारणात खूप काही शिकायला मिळालं आणि काहीजण सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करुन गेले, आयुष्यात त्यांचा मी सदैव ऋणी राहीन, मला आता निवडणूक लढवण्यात वगैरे कुठलाच रस राहिला नाही. यावर टीका करणारे टीका करतील. पण जिथे मनाला पटत नाहीत तिथे स्वत:चा आणि इतरांचा वेळ वाया घालवणं मला कधीच पटत नाही. माझ्याकडून कळत नकळत काही लोकांना दुखावलं असेल त्याबाद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

राजकारणातून दूर होण्यामागे नक्की कारण काय? : निलेश राणे हे राज्याच्या राजकरणात नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणांनी चर्चेत राहिले आहेत. २००९ साली पंधराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा सलग दोनदा पराभव झाला होता. दरम्यान, निलेश राणे यांनी आता सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यामागची कारणं नक्की काय असू शकतात याबाबत सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अशात अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने कोकणात सध्या उमेदवारीवरून अनेक अंतर्गत घडामोडी घडत आहेत. त्यातच निलेश राणे यांनी खासदारकी ऐवजी सिंधुदुर्गातील कुडाळ मालवणमधून आमदारकी लढवावी असा सुद्धा एक मतप्रवाह मागे निर्माण झाला होता. सध्या कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी पराभव केला होता. वैभव नाईक हे २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. अशात निलेश राणे यांनी राजकारण सोडण्यामागे नक्की कारण काय? याबाबत भाजपाकडून किंवा त्यांच्या परिवारातून कुठलीही प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही.

शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर वादात सापडले-भाजपाचे नेते निलेश राणे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना औरंगजेब यांच्याबरोबर केली होती. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. पक्षाने नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी केली होती. तर दुसरीकडं भाजपा नेते निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात अनेकदा वाक्युद्ध दिसून आले. राणे सुपुत्रांमुळे भाजप आणि शिंदे गटात खडाजंगी झाल्याचे अनेकदा दिसून आले होते.

दीपक केसरकर यांच्याविरोधात सातत्याने वाक्युद्ध- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी टीका केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे हे भडकले होते. त्यांनी थेट केसरकर यांची लायकी काढली होती. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले होते, की दीपक केसरकर यांनी मी राणेंबरोबर काम करायला तयार असल्याचं म्हटलं. त्यांनी नोकरी मागायची असेल तर नीट मागावी. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी असे पोस्ट करत त्यांनी केसरकर यांची खिल्ली उडविली होती.

हेही वाचा-

  1. Sanjay Kakade News: भाजप नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर बंदी आणावी- संजय काकडेंची रोखठोक मागणी
  2. Nilesh Rane vs Sharad pawar : निलेश राणेंकडून शरद पवारांची तुलना; अमोल मिटकरींनी दिले सणसणीत उत्तर

Last Updated : Oct 24, 2023, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.