मुंबई - बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे ५ टक्के कमीशन मागतील, अशी खोचक टीका माजी खासदार निलेश राणेंनी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती.
निलेश राणेंच्या विधानावरुन ठाकरे विरुद्ध राणे हा नवा वाद भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणेंच्या या टीकेला शिवसेना आता कशाप्रकारे प्रतिउत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या स्मारकासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. मात्र, ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर निविदेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ठेकेदार हुशार आहेत. त्यांना माहीत आहे की उद्धव ठाकरे यात पण ५ टक्के मागतील, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.