WC IND VS ENG : भारताला पराभवाचा धक्का.. पाकची धाकधूक वाढली, इंग्लडचे आव्हान कायम
बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय खेळाडूंना हे आव्हान पेलवले नाही. भारतीय संघाने निर्धारीत ५० षटकात ५ बाद ३०६ धावा केल्या. वाचा सविस्तर
खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, नवे दर १ जुलैपासून होणार लागू
नवी दिल्ली - विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणा इंडियन ऑईल कार्पोरेशनने केली आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची ठरणार आहे. दिल्लीमध्ये येत्या १ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. वाचा सविस्तर
व्हिडिओ : प्रेमाची अमानुष शिक्षा, तरुणीला नातेवाईकांकडून जबर मारहाण
धार - मध्य प्रदेशातील धारमध्ये एससीएसटी समाजातील युवकाशी प्रेमसंबंध असल्याने आदिवासी तरुणीला तिच्याच नातेवाईकांकडून जबर मारहाण करण्यात आली. तसेच, या मारपिटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या भावांसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून घटनेची चौकशी सुरू आहे. वाचा सविस्तर
पत्नीने मागितले ३० रुपये, पती रस्त्यातच बोलला... तलाक.! तलाक.! तलाक.!
नवी दिल्ली/नोएडा - दिल्लीला लागूनच असलेल्या ग्रेटर नोएडा येथून तिहेरी तलाकचे हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात ही घटना घडली. पत्नीने पतीकडे भाजी घेण्यासाठी ३० रुपये मागितले. तर, यावर पतीने तिहेरी तलाकचा उच्चार केला. तीन तलाकच्या प्रकरणांवरच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयक सादर केले होते. वाचा सविस्तर
जळगावात रसायनाच्या कंपनीत स्फोट; भीषण आगीत कंपनी जळून खाक
जळगाव - शहरातील औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये असलेल्या रवी इंडस्ट्रीज या रसायनाच्या कंपनीस रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीतील ज्वालाग्राही रसायन पेटल्याने मोठे स्फोट होऊन क्षणार्धात आग भडकली. आगीत कंपनी खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. वाचा सविस्तर