रामदास आठवलेंचा एनडीएला घरचा आहेर; म्हणाले सत्ता येईल परंतु..
लातूर - लोकसभा निवडणुकांचा निकाल काही दिवसांनी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निकालाबाबात आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दुष्काळ पाहणीच्या अनुशंगाने लातुरात आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मित्र पक्षाचा एकही पदाधिकारी त्यांच्या समवेत नसल्याची चर्चा रंगली होती. वाचा सविस्तर..
जिनांसारखा विद्वान भारताचा पंतप्रधान बनला असता तर.., भाजप उमेदवाराकडून जिनांवर स्तुतीसुमने
रतलाम - भारत स्वतंत्र होत असताना जर पंडित नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद जिना यांना पंतप्रधान बनवले असते तर भारताचे दोन तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवाराने केले आहे. गुमानसिंग दामोर असे या उमेदवारांचे नाव असून ते रतलाम-झाबुआ या मतदारसंघात निवडणुकीस उभे आहेत. वाचा सविस्तर..
मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत फायरिंग; अंत्ययात्रेत सामील वृद्धाचा गोळी लागून मृत्यू, जळगावमधील घटना
जळगाव - अंत्ययात्रेत मृताला मानवंदना देण्यासाठी बंदुकीने हवेत दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेत आलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात आज घडली. तुकाराम वना बडगुजर (वय ६०, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. वाचा सविस्तर..
व्हिडिओ व्हायरल.. जेव्हा कायद्याचे धडे देणारा पोलीसच तोडतो वाहतुकीचे नियम.. घटना सीसीटीव्हीत कैद
मुंबई - सामान्य नागरिकांना वाहतुकीचे धडे देणारे पोलीस प्रशासनातील कर्मचारी मात्र हे नियम कशा प्रकारे तोडतात. कोणी त्यांना प्रतिउत्तर केले तर कशा प्रकारे त्याला धमकावतात, याची प्रचिती मुंबईत आली आहे. मुंबईच्या रस्त्यावरचा सामान्य नागरिक विरुद्ध पोलीस असा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर..
लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा; धारणी तालुक्यातील प्रकार
अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भवर गावामध्ये एका लग्न सोहळामध्ये जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची परिस्थिती खालवत चालल्याने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर तेथेही त्यांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे स्थानंतरीत करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..
आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - घडामोडी
रामदास आठवलेंनी एनडीएला घरचा आहेर दिला. भाजप उमेदवाराने जिनांवर स्तुतीसुमने उधळली. मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत फायरिंग केल्यामुळे अंत्ययात्रेत सामील झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल. धारणी तालुक्यात लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा झाली.
रामदास आठवलेंचा एनडीएला घरचा आहेर; म्हणाले सत्ता येईल परंतु..
लातूर - लोकसभा निवडणुकांचा निकाल काही दिवसांनी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निकालाबाबात आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दुष्काळ पाहणीच्या अनुशंगाने लातुरात आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मित्र पक्षाचा एकही पदाधिकारी त्यांच्या समवेत नसल्याची चर्चा रंगली होती. वाचा सविस्तर..
जिनांसारखा विद्वान भारताचा पंतप्रधान बनला असता तर.., भाजप उमेदवाराकडून जिनांवर स्तुतीसुमने
रतलाम - भारत स्वतंत्र होत असताना जर पंडित नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद जिना यांना पंतप्रधान बनवले असते तर भारताचे दोन तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवाराने केले आहे. गुमानसिंग दामोर असे या उमेदवारांचे नाव असून ते रतलाम-झाबुआ या मतदारसंघात निवडणुकीस उभे आहेत. वाचा सविस्तर..
मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत फायरिंग; अंत्ययात्रेत सामील वृद्धाचा गोळी लागून मृत्यू, जळगावमधील घटना
जळगाव - अंत्ययात्रेत मृताला मानवंदना देण्यासाठी बंदुकीने हवेत दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेत आलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात आज घडली. तुकाराम वना बडगुजर (वय ६०, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. वाचा सविस्तर..
व्हिडिओ व्हायरल.. जेव्हा कायद्याचे धडे देणारा पोलीसच तोडतो वाहतुकीचे नियम.. घटना सीसीटीव्हीत कैद
मुंबई - सामान्य नागरिकांना वाहतुकीचे धडे देणारे पोलीस प्रशासनातील कर्मचारी मात्र हे नियम कशा प्रकारे तोडतात. कोणी त्यांना प्रतिउत्तर केले तर कशा प्रकारे त्याला धमकावतात, याची प्रचिती मुंबईत आली आहे. मुंबईच्या रस्त्यावरचा सामान्य नागरिक विरुद्ध पोलीस असा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर..
लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा; धारणी तालुक्यातील प्रकार
अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भवर गावामध्ये एका लग्न सोहळामध्ये जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची परिस्थिती खालवत चालल्याने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर तेथेही त्यांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे स्थानंतरीत करण्यात आले आहे. वाचा सविस्तर..
Dummy
Conclusion: