मुंबई - अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या प्रकरणाचा तपास केला जात असून आता या प्रकरणाचे अंधेरी संबंध समोर आला आहे.
रात्री उशीरापर्यंत एनआयएची टीम सचिन वाजेला सोबत घेऊन शोध मोहीम राबवत होती. पहाटे चार वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. एनआयएकडून वाझे हा मनसुख हिरेन यांच्या मृत्यू पूर्वी कुठे कुठे गेला होता याचा शोध घेतेय. या तपासात वाझेने हिरेन यांच्या मृत्यूपूर्वी अंधेरीत एक बैठक केल्याची सूत्रांची माहिती आहे. याचाच तपास करण्यासाठी ही शोध मोहीम सुरू आहे.
या प्रकरणात नेमका अंधेरीत वाझे का गेला होता? हिरनच्या मृत्यूपूर्वी तो कोणाला भेटला होता? भेटीत नेमकी काय चर्चा झाली? भेटलेल्या व्यक्तीचा नेमका प्रकरणाशी किती खोलवर संबंध आहे, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, वाझेने हिरेन मृत्यूपूर्वी एक दिवस आधी केलेली ही बैठक नक्कीच संशयास्पद आहे, हे नाकारता येत नाही.