मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी ( Businessman Mukesh Amban ) यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर ( Antilia residence of industrialist Mukesh Ambani ) सापडलेले स्फोटक ( Antilia Explosive Case ) प्रकरणी आज सुनावणी झाली. मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील ( Mansukh Hiren murder case ) यावेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट आरोपी प्रदीप शर्मा ( Encounter Specialist Pradeep Sharma ) यांच्या जामीन अर्जावर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
एनआयएला सीडीआर सादर करण्याचे निर्देश - आज झालेल्या सुनावणी दरम्यान, 17 फेब्रुवारी 2021 ला सायंकाळी 8 वाजता सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यात कथित भेट विक्रोळीत झाल्याचा एनआयएच्या आरोप पत्रात उल्लेख केला होता. या विरोधात आज प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी कोर्टात सीडीआर सादर केला आहे. यामध्ये प्रदीप शर्मा यांचे लोकेशन, तसेच सचिन वझे यांच्या लोकेशनमध्ये खूप अंतर असल्याचे शर्मा यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने कोर्टाने एनआयएला सीडीआर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
NIA च्या दाव्यात तथ्थ नाही - प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी सादर केलेल्या फोन लोकेशन तसेच CDR चा खुलासा सादर करा असे निर्देश कोर्टाने NIA वकिलांना दिले. NIA नं सदर केलेला लोकेशन दाव्यात तथ्य नसल्याचं CDR मधून स्पष्ट होत आहे असे आबाद पोंडा यांनी म्हटले आहे.
अटर्नी जनरल अनिल सिंह यांचा युक्तिवाद
- सचिन वाझे आणी प्रदीप शर्मा यात 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा NIA चा दावा
- सचिन वाझे आणी प्रदीप शर्मा यांचे विक्रोळीत एकाचवेळी फोन लोकेशन असल्याचा केला दावा
- CDR पुरावा केला सादर
- या आधी प्रदीप शर्मा यांचं फोन लोकेशन माझगाव डॉक परिसरात
स्कोर्पियोचा स्थळपुरावा अनिल सिंह यांनी केला सादर
- 17,18 आणी 25 ला विक्रोळी आणी कार मायकल रोडवर एकाच स्कोर्पियोचं लोकेशन
आबाद पोंडा (प्रदीप शर्मा यांचे वकील) यांचा युक्तिवाद
- प्रदीप शर्मा यांच्या फोन लोकेशन पुराव्यावरून, आबाद पोंडा यांनी केले पुरावे सादर
- अनिलसिंह यांचे सर्व आरोप अमान्य
- परिस्थितीजन्य पुरावा केला सादर
- त्याच नं छान CDR पुरावा केला सादर
या CDR नुसार
- मस्जिद बंदरला 8:16 मिनिटांनी होते
- 8:25 मिनिटांपर्यंत मस्जिद बंदर लोकेशन
- 9:10 मिनिटांनी गांधीनगर विक्रोळी वेस्ट लोकेशन
- वाझे यांचं विक्रोळी ईस्ट अर्थात इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर लोकेशन
- दोन्ही लोकेशनमध्ये बरंच अंतर
- कार विक्रोळी ईस्टला पार्क करून मित्राच्या कारनं विक्रोळी वेस्टला गेले कार दिसली असेल
- मात्र फोन लोकेशन विक्रोळी वेस्ट प्रूव्ह करतं की वझे आणी शर्मा हे एकाचवेळी एकाच लोकेशनला नव्हते
- NIA चा दावा खोटा
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय? मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत डोक्यालाही मार लागलेला होता.