ETV Bharat / state

लॉकडाऊन : उपासमार झालेल्या 500 जणांना 'कनेक्ट'ने केले कनेक्ट - मुंबई कोरोना

महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांच्याबरोबर मदतीसाठी पाठपुरावा करून या 500 जणांची राहण्याची आणि भोजनाची सोय करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यातील 50 जणांची बिकेसी येथील उत्तर प्रदेश भवन राहण्याची व्यवस्था केली आहे, तर उरलेल्या लोकांचा जशी जागा उपलब्ध होईल तशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वस्तरातून होताना दिसत आहे.

ngo accompined some youth helps poor people
लॉकडाऊन : उपासमार झालेल्या 500 जणांना 'कनेक्ट'ने केले कनेक्ट
author img

By

Published : Apr 3, 2020, 10:09 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या गोंधळात गावी जायला निघालेले कामगार आणि त्यांचे कुटूंब कुर्ला लोकमान्य टर्मिनस येथे 10 दिवसांपासून अडकले होते. त्यांच्या मदतीला स्थानिक समाजसेवक मयंक गर्ग आणि 'कनेक्ट' या सामाजिक संस्थेचे राजेश इंगळे या लोकांसाठी धावून गेले.

महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांच्याबरोबर मदतीसाठी पाठपुरावा करून या 500 जणांची राहण्याची आणि भोजनाची सोय करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यातील 50 जणांची बिकेसी येथील उत्तर प्रदेश भवन राहण्याची व्यवस्था केली आहे, तर उरलेल्या लोकांचा जशी जागा उपलब्ध होईल तशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वस्तरातून होताना दिसत आहे.

लॉकडाऊन : उपासमार झालेल्या 500 जणांना 'कनेक्ट'ने केले कनेक्ट

रेल्वेसेवा बंद होण्याआधी आपल्या गावी जाण्यासाठी पोटावर हात असलेल्या मुंबईतील कामगारांनी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली होती. गर्दी पाहता उपनगरीय लोकल सेवा आणि भारतीय रेल्वे सेवा बंद करण्यात आली. यावेळी अनेक जण कुर्ला लोकमान्य टर्मिनस येथे अडकले. 500 पेक्षा जास्त प्रवासी येथे होते. स्थानक परिसरात कसेबसे राहून दिवस काढत होते. 10 दिवस प्रचंड त्रास सहन करित होते. यात काही जण मुंबईत बेघर होते. उपासमार आणि कुठल्याही सोयी सुविधा नव्हती. पोलिसांकडून धरपकडही होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मयंक गर्ग यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने खाद्य पदार्थ पुरवून सुरुवातीला मदत करण्याचा प्रयत्न केला.

मयंक गर्ग अनेक लोकांना भेटून मदत मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांनी 'CONNECT' या CSR-NGO सामाजिक संस्थेला मदतीकरिता संपर्क केला असता असे ठरले की तात्पुरता खाद्य पुरवठा करुन उपयोग नाही. लोकांना अन्नपाणी, शौचालय, आंघोळ नाही, उघड्यावर राहणे सुरक्षित नाही म्हणूनच शासकीय अधिका-यांना संपर्क केला गेला. अनेक कटू अनुभव आले. शेवट योग्यच झाला. स्थानिक महापालिका अधिकारी व पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी मदतीला आले. आज या सर्व लोकांना आता उत्तर प्रदेश भवन- BKC वांद्रे येथे राहण्याची व्यवस्था केली गेली आहे.

पालिका अधिकारी आणि राज्य सरकार या अडचणीत सापडलेल्या लोकांना पुरेसे अन्न व स्वच्छताविषयक मदत जर वेळेत करू शकले नाही तर हा एक आरोग्याचा टाईम बॉम्बच ठरला असता. शासन आणि सामाजिक संस्था यांच्या सह्कार्य व संयोजनाशिवाय योग्य रिझल्ट मिळणे अशक्य आहे. अनेक योजना या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. 'CONNECT' गेले अनेक दिवस अशा अडकून पडलेल्या लोकांच्या मदतीकरिता मार्गदर्शन करित आहे. तसेच आम्ही आतापर्यत मुंबईच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या 1500 लोकांना आमच्या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. यात राष्ट्रसेवेचे समाधान आहे, असे मत कनेक्ट या संस्थेचे राजेश इंगळे यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.