ETV Bharat / state

शनिवारपासून मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू - मुंबई मध्ये रेल्वे

बदलेल्या वेळेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होणार आहे. परेल लोकलच्या संख्येत 3 ने वाढ करण्यात आल्यामुळे परेल लोकलची संख्या आता 38 झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Central Railway
मध्ये रेल्वे
author img

By

Published : Dec 12, 2019, 2:08 AM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर शनिवार 14 डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकात पहिली कसारा-सीएसएमटी लोकल 34 मिनिटे अगोदर सुटणार आहे. तर उर्वरित लोकलच्या 42 फेऱ्यांच्या वेळात 5 मिनिटांनी बदल करण्यात आला आहे.

बदलेल्या वेळेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होणार आहे. परेल लोकलच्या संख्येत 3 ने वाढ करण्यात आल्यामुळे परेल लोकलची संख्या आता 38 झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'नाल्यांमध्ये जाणारा कचरा रोखण्यासाठी झोपडपट्टीतील गटारांवर जाळ्या बसवा'

मध्य रेल्वेवर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवीन वेळापत्रक लागू होते. मात्र, यंदा वेळापत्रकास काहीसा विलंब झाला आहे. या नवीन वेळापत्रकात लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर भर न देता लोकलच्या वेळात बदल करुन वेळापत्रकाचा वक्तशीरपणा सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. वेळा बदलण्यात आलेल्या लोकलमध्ये कल्याण, कर्जत, टिटवाळा, खोपाली, ठाणे लोकलचा समावेश असल्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बदल करण्यात आलेल्या लोकल

अनेक लोकलच्या गंतव्य स्थानकात देखील बदल करण्यात आलेला आहे. सकाळी 11.42 ची सीएसएमटी -कल्याण लोकल आता सकाळी 11.42 वाजता परेल स्थानकातून कल्याणकरता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी रात्री 9 ची लोकल आता रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी निघणार आहे. ठाणे-कर्जत सकाळी 10.48 ची लोकल सीएसएमटी स्थानकातून सकाळी 10 वाजता सुटणार आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा भाजपला आणखी एक दणका; महामंडळावरील नियुक्त्या करणार रद्द?

बदलापुर-सीएसएमटी दुपारी 12.22 ची लोकल आता दुपारी 12.20 ला धावणार आहे. कर्जत-ठाणे दुपारी 12.21 ची लोकल दुपारी 12.23 वाजता, अबंरनाथ-सीएसएमटी रात्री 9.15 ची लोकल रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी सुटणार आहेत. याशिवाय संध्याकाळी 6 .48 ची लोकल कल्याण-दादर,सकाळी 9.54 ची टिटवाळा-ठाणे लोकल, सकाळी 11.17 ची कल्याण-दादर लोकल परेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.

Intro:
मुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर शनिवार 14 डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकात पहिली कसारा-सीएसएमटी लोकल 34 मिनिटे अगोदर सुटणार आहे. तर उर्वरित लोकलच्या 42 फेऱ्यांच्या वेळात पाच मिनिटांनी बदल करण्यात आलेला आहे. बदलेल्या वेळेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल. परेल लोकलच्या संख्येत 3 ने वाढ करण्यात आल्यामुळे परेल लोकलची संख्या आता 38 झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Body:मध्य रेल्वेवर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवीन वेळापत्रक लागू होते. मात्र यंदा वेळापत्रकास काहीसा विलंब झाला आहे. या नवीन वेळापत्रकात लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर भर न देता लोकलच्या वेळात बदल करुन वेळापत्रकाचा वक्तशीरपणा सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. वेळा बदलण्यात आलेल्या लोकलमध्ये कल्याण, कर्जत, टिटवाळा, खोपाली, ठाणे लोकलचा समावेश असल्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बदल करण्यात आलेल्या लोकल
अनेक लोकलच्या गंतव्य स्थानकात देखील बदल करण्यात आलेला आहे. स.11.42 ची सीएसएमटी -कल्याण लोकल आता सकाळी 11.42 वाजता परेल स्थानकातुन कल्याणकरिता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी रात्री 9 ची लोकल आता रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी निघणार आहे. ठाणे-कर्जत स. 10.48 ची लोकल सीएसएमटी स्थानकातुन स. 10 वाजता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी दु.12.22 ची लोकल आता दु.12.20 ला धावणार आहे. कर्जत-ठाणे दु.12.21 ची लोकल दु.12.23 वाजता, अबंरनाथ-सीएसएमटी रात्री 9.15 ची लोकल रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी सुटणार आहेत. याशिवाय संध्या.6 .48 ची लोकल कल्याण-दादर,स.9 . 54 ची टिटवाळा-ठाणे लोकल, स.11.17 ची कल्याण-दादर लोकल परेल स्थानकापर्यत चालविण्यात येणार आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.