ETV Bharat / state

मुंबईत 1 हजार 66 नवे कोरोनाबाधित, 48 जणांचा मृत्यू; एकूण संख्या 1 लाख 23 हजारांवर

author img

By

Published : Aug 9, 2020, 10:12 PM IST

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस तर सरासरी दर 0.81 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 589 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत.

मुंबईत 1 हजार 66 नवे कोरोनाबाधित
मुंबईत 1 हजार 66 नवे कोरोनाबाधित

मुंबई - मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 23 हजार 397 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 796 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 232 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 96 हजार 586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 19 हजार 718 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 78 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 48 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 36 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 36 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 232 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 96 हजार 586 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 23 हजार 397 रुग्ण असून 96 हजार 586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 796 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 718 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस तर सरासरी दर 0.81 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 589 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 384 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 99 हजार 791 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.