मुंबई - राज्यात आज कोरोनाच्या ९४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६०८७ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २९२ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ४६ रुग्ण आयसीयुमध्ये दाखला आहेत. अशी माहिती आरोग्य व्हिभगाकडून देण्यात आली आहे.
९४९ रुग्णांची नोंद - राज्यात आज ९४९ रुग्णांची नोंद झाली आहे. ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९१२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात गेल्या ३ वर्षात ८१ लाख ५७ हजार २९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख २ हजार ६९० रुग्ण बरे झाले आहेत तर १ लाख ४८ हजार ४८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १५ हजार ३१३ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १२ हजार ३२१ चाचण्या सरकारी प्रयोगशाळेत, २६६२ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत, तर ३३० चाचण्या सेल्फ टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यात XBB 1.16 व्हरियंटचे ६८१ रुग्ण आढळून आले असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
साडेतीन महिन्यात ६८ मृत्यू - १ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडेतीन महिन्यात कोरोनामुळे ६८ मृत्यू झाले आहेत. त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७४.५३ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ५७ टक्के मृत्यू झाले आहेत. ९ टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत तर ३४ टक्के मृत्यू हे कशामुळे झाले याची माहिती नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
४६ रुग्ण गंभीर -राज्यात ६०८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५७९५ म्हणजेच ९५.२ टक्के रुग्ण गृह विलागिकरणात आहेत. २९२ टक्के ४.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २४८ म्हणजेच ४.१ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर ४६ म्हणजेच ०.७ टक्के रुग्ण आयसीयु मध्ये आहेत.
हेही वाचा - Corona Virus : अबब! मागील तीन वर्षात कोरोनामुळे तब्बल 'इतके' करोड लोकं होते क्वारंटाईन