ETV Bharat / state

Sharad Pawar supporter : 'त्या' आमदारांच्या मतदार संघातील 80 टक्के कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी - महेश तपासे - Rohit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हावर दावा केल्यामुळे राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्वाची बैठक झाली.

Sharad Pawar On Sharad Pawar
Sharad Pawar On Sharad Pawar
author img

By

Published : Jul 15, 2023, 10:24 PM IST

Updated : Jul 15, 2023, 10:34 PM IST

महेश तपासे यांची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दिल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

महत्वाची बैठक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या उपस्थित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्हा प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले. भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाला आपल्याला विरोध करायचा असेल, तर आपल्या पक्षाची विचारसरणी अंगीकारली पाहिजे. सर्वसमावेशकता, समानता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.

आम्ही पवार साहेबांसोबत : आम्ही पवार साहेबांसोबत आहोत. आम्ही पुन्हा एकदा जोमाने पक्षाची विचारसरणी, ध्येयधोरणे गावा गावात पोहचवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांविरुद्ध आपण आक्रमक पवित्र घेणार का? या प्रश्नाला उत्तर देताना महेश तपासे म्हणाले की, आमची लढाई वैचारिक आहे. आमचे विचार लोकशाहीचे, महात्मा गांधींच्या सर्व धर्म समभावाचे आहेत. जे भाजप सरकारमध्ये गेले त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विचारसरणीशी फारकत घेतली आहे, असे तपासे म्हणाले.

कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणाऱ्या आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना महेश तपासे म्हणाले की, आमदारांच्या काय मर्यादा असतात, हे मला माहीत नाही. ज्या आमदाराने अशाप्रकारे निर्णय घेतला 'त्या' आमदारांच्या मतदारसंघातील 80% कार्यकर्ते हे शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आमदार आले-गेले त्याने काही फरक पडत नाही. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनावर शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांच्या विचारांचा शिक्का असून 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करू असा विश्वास प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Shinde Group : अजित पवारांना अर्थ खाते नको तर तुमचे मुख्यमंत्रीपद द्या, शिंदेंना होती ऑफर - संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Last Updated : Jul 15, 2023, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.