ETV Bharat / state

सभा, कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांना बसण्याची मुभा द्या, पवारांचे गृहमंत्री देशमुखांना पत्र - पोलीस बैठकव्यवस्था शरद पवार मागणी

राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे त्यांनी आयोजक व उपस्थितांचे लक्ष वेधले. जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते, असे ते म्हणाले.

NCP president sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Feb 14, 2020, 9:48 AM IST

मुंबई - राज्यात कुठेही सभा, कार्यक्रम सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना खूप वेळ उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्यासाठी मुभा असावी, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

home minister anil deshmukh
शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना लिहिलेले पत्र

स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त मिरजमधील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले आहे.

राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे त्यांनी आयोजक व उपस्थितांचे लक्ष वेधले. जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही ,तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात. सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे. मात्र, सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही, असेही पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात. तसेच पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, असेही शरद पवार यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.