मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आज (11 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या व माजी शिक्षण मंत्री फौजिया खान या गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, सहाय्यक निवडणूक अधिकारी विलास आठवले यांच्यासमोर पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री दत्ता बारणे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार शशिकांत शिंदे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार प्रकाश सोळंके, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे नेते, सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.