ETV Bharat / state

Sharad Pawar 82nd birthday : देशाच्या राजकारणावर ठसा उमटवणारे शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस, जाणून घ्या राजकीय प्रवास

देशाच्या राजकारणावर ठसा उमटवणारे शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस ( Sharad Pawar 82nd birthday ) आहे. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथून डिजिटल व्हर्च्युअल रॅली करणार ( Sharad Pawar Digital Virtual Rally ) आहेत. घेऊयात त्यांच्या राजकीय जावनातील प्रवासाचा आढावा

Sharad Pawar 82nd birthday
शरद पवार यांचा वाढदिवस
author img

By

Published : Dec 12, 2022, 9:36 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar 82nd birthday ) पक्षाकडून काल आणि आज असे दोन दिवस राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ( Sharad Pawar Birthday Events Organized ) आहे. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथून डिजिटल व्हर्च्युअल रॅली वाढदिवसानिमित्त करणार आहेत. त्या रॅलीच्या माध्यमातून आपल्या पक्षातील सर्व नेते कार्यकर्त्यांशी ते थेट संवाद ( Sharad Pawar Digital Virtual Rally ) साधतील. तसेच आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

शरद पवार यांचा अल्प परिचय : १२ डिसेंबर १९४० साली शरद पवार यांचा जन्म बारामतीत झाला. शरद पवार हे देशातील सर्वात जाणकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्द १९५६ साली विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाली. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. आणि त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्याच काळात विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमाला तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार भाषणामुळे मुख्यमंत्री देखील त्यांच्याकडून प्रभावीत झाले. त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. यशवंतरावांच्या सांगण्यावरुनच पवारांनी पुढे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष ( Maharashtra Youth Congress President at 24 age ) झाले. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. अगदी वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते सभाही झाले. काँग्रेसचे १२ आमदार फोडून शरद पवार पहिल्यांदा १९७८ ला मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांचे सरकार ( Sharad Pawar Political Career ) पाडले.

१९८५ साली लोकसभेवर : १९८५ साली शरद पवार हे लोकसभेवर गेले. १९८५ साली विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली. मात्र त्यांनी लोकसभा सदयत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. १९८७ साली शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे केला. त्यावेळी १९८८ साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. गांधी यांच्या हत्त्येनंतर पंतप्रधानपदी नरसिंह राव विराजमान झाले. नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांना संधी देण्यात आली.

देशाच्या राजकारणात उतरले : १९९५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली. मात्र त्यानंतर १९९६ ला शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक जिंकत देशाच्या राजकारणात उतरले. मात्र त्यानंतर सोनिया गांधी यांना पंतप्रधान.पदाच्या उमेदवारीवरून शरद पवार यांचे काँग्रेसमध्ये मतभेद झाले. आणि शरद पवार यांनी १९९९ साली आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकी नंतर शरद पवार यांनी काँग्रेस सोबत राज्यात आघाडीचे सरकारने सत्तेत आले. यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.

आघाडी सरकारमध्ये सामील: २००४ साली केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी होती. 2009 साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. २०१९ साली शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवत भाजपला आव्हान दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे हे सरकार पडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.