ETV Bharat / state

Jitendra Awhad : राज्यापालांनी महाराष्ट्रातून चालते व्हावे - जितेंद्र आव्हाड - Awhad

राज्यपाल भगतशिंह कोश्यारींनी ( Governor Bhagat Singh Koshyari ) महाराष्ट्रातून चालते व्हावे असे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड( ( NCP leader Jitendra Awhad ) ) यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्यातील नागरिकांची मने दुखावली आहे. महापूरुषांचा अवमान केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी स्वतःहून महाराष्ट्र सोडून निघून जावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 28, 2022, 5:09 PM IST

ठाणे - महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ( Governor Bhagat Singh Koshyari ) गप गुमान निघून जावा ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( NCP leader Jitendra Awhad ) यांनी आज केली आहे. आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त केलेली विधाना ही महाराष्ट्राला दुखावणारी आहे महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य नागरिकांना दुखावणारी आहेत सर्वसामान्यांच्या भावनांना ठेस पोचवणारी आहे त्यामुळे राज्यपालांनी स्वतःहून महाराष्ट्र सोडून निघून जावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड

तुमचे सोंग बदलतात - काल राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या कालच्या सभेचाही जितेंद्र आव्हाड यांनी समाचार ( Jitendra Awhad criticizes Raj Thackeray's meeting ) घेतला. कालच्या भाषणात वेगळा विषय बोलायचा हर हर महादेव यावेळी वेगळे बोलायचं जिथे जाणार तिकडे तुमचे सोंग बदलतात. जेम्स यांच्या वेळी वेगळा व पुरंदरेंच्या वेळोवेळी भूमिका हे सर्व आता महाराष्ट्राला माहित पडलेल आहे. महाराष्ट्र बंदचा तर आता जवळजवळ निर्णय झालेला आहे असे, देखील आव्हाड यांनी सांगितले.

चुकीचा इतिहास महाराष्ट्रात - ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांच्या बद्दल वक्तव्य करणारे हे राज्यपाल यांच्यामुळे जर शिकू शकलेले आहेत. आता शिकत असलेले प्रत्येक स्त्री ही सावित्री फुले यांच्यामुळे शिकत आहे. हा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात गेला पाहिजे. काही लोक परंतु चुकीचा इतिहास महाराष्ट्रात पसरवत आहेत. राज ठाकरे असे विषय घेतात की, जेव्हा त्यांना वाटतं महाराष्ट्र मला विसरतोय तेव्हा असे विषय ते घेतात. कारण महाराष्ट्राने लक्षात ठेवला पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकांना न वाचल्यामुळे ते अशा प्रकारचे विधान करू शकतात. भारतात त्यांच्यासारखी नक्कलबाजी कोणीच करू शकत नाही, ते मोठे नकलाकार आहेत. राहुल गांधी यांच्यावरती नकला करणे खूप सोपा आहे. परंतु राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे यात्रा केली त्याप्रमाणे शिवाजी पार्क ते सीएसटी एवढं चालून दाखवावं असा टोला ही यावेळी लगावला.

राज्यपालांच्या पदमुक्त विधानावर माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले....

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitribai Phule Pune University ) माध्यमातून जे अथर्वशिष्य पठण अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. याला विरोध होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ ( Nationalist Congress leader Chhagan Bhujbal ) यांना विचारलं असता ते म्हणाले की जे हे कार्यक्रम ठरवतात ते अभ्यास कमिटी अस्तित्वात नाही.

छगन भूजबळ

आयटी, इंजिनिअरिंग शिकायचं नाही का ? आत्ताचे जे कुलगुरू आहे ते प्रभारी आहे. कोणाचीही परवानगी घेतलेली नाही, असे असताना हे अभ्यास सुरू केलं आहे.आज एक आहे उद्या सर्वच धर्माचे जे शिक्षण आहे, त्यांना श्रेयांक द्यावं लागणार आहे. मग आत्ता काय विज्ञान, आयटी, इंजिनिअरिंग शिकायचं नाही का ? यातच डोकं मारायचं का? मन शांती मिळणार आहे का असा प्रश्व त्यांनी उपस्थित केला आहे. जे पूर्वजांनी सांगितल आहे ते करा ना अस यावेळी भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

'समता पुरस्कार' ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांची १३२ वी पुण्यतिथी साजरी करणात आली. समता दिनानिमित्त यंदाचा 'समता पुरस्कार' ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात आला यावेळी भुजबळ बोलत होते.

राज्यपालांना दिल्लीच्या लोकांनी ठेवले आहे - राज्यपाल यांनी इच्छा व्यक्त केली आहे की मला पदमुक्त करा यावर, भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की राज्यपाल अनेक दिवसांपासून अस सांगत आहे. मी देखील एकल आहे. आमच्या काळात देखील ते असच म्हणत होते. काय आहे ना दिल्लीच्या लोकांनी त्यांना ठेवलं आहे. त्यांना वाटल तर ते निर्णय घेऊ शकतात अस यावेळी भुजबळ म्हणाले.

बसून एकत्रित निर्णय घेणार - राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकार एकत्र येणार का यावर भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की याबाबत आघाडीचे जे नेते आहे. ते बसून एकत्रित निर्णय घेतील असे यावेळी भुजबळ म्हणाले.

फुले, शाहू, आंबेडकरांसाठी नेहमी रस्त्यावर - भिडे वाड्या बाबत भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही याबाबत आंदोलन करू. पण याबाबत मी आजच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. की याची बैठक घ्यावी लागेल. त्यांनी होकार दिला आहे. एक महिना वाट बघू. आणि नेहेमीच फुले शाहू आंबेडकर यांच्यासाठी रस्त्यावर यावे लागते. तसे रस्त्यावर येऊ असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.