ETV Bharat / state

Amol Mitkari Criticize Raj Thackeray : टुणकन उडी मारणारा पक्ष आमचा नाही, राज ठाकरेंना मिटकरींचा टोला

गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray) यांनी अजित पवारांची मिमिक्री करीत टीका केली आहे. या भेटीवर ठाकरे गट, काँग्रेस पक्ष नाराज असून दोघांनीही शरद पवारांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

Amol Mitkari Criticize Raj Thackeray
Amol Mitkari Criticize Raj Thackeray
author img

By

Published : Aug 16, 2023, 8:25 PM IST

अमोल मिटकरी माध्यमांशी संवाद साधताना

मुंबई : अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज देवगिरी बंगल्यावर झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आज झालेल्या बैठकीत सरकारच्या योजना, पक्षाचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारे आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. आज झालेल्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज ठाकरेंवर मिटकरींची टीका : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर राजकारण तापले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष या भेटीवर नाराज असून शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे दोघेही आवाहन करत आहेत. बैठकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत समाचार घेतला. तर लोक ईडीची नोटीस मिळताच आपली भूमिका बदलतात. त्यांनी अजित पवारांवर भाष्य करणे म्हणजे सूर्याला वाकोल्या दाखवल्यासारखे असल्याची टीका पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केली आहे. आमचा पक्ष तुमच्यासारखा टुणकन उडी मारणारा पक्ष नसल्याचा टोलादेखील मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

सभांमुळे लोकांच्या मनात संभ्रम : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या ओबीसी समाजाच्या जास्त सभा घेताना दिसत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरी म्हणाले की, शरद पवार यांनी नेमलेल्या ठिकाणी सभा घ्याव्या. उद्याच्या बीडमधील सभेनंतर ते स्पष्ट होईलच. मात्र, सभांमुळे लोकांच्या मनात संभ्रम करू नये असा उपरोधिक टोला देखील मिटकरी यांनी शरद पवारांना लगावला आहे.

तुमचे आमदार सांभाळा : अजित पवारांवर लादलेल्या अटींबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याला मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार हे भाजपचे एजंट आहेत का? कारण वडेट्टीवारांना दिल्लीश्‍वरांची सर्व माहिती कशी मिळते? विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे एजंट म्हणून काम करू नये. त्यांनी काँग्रेसचे आमदार संभाळावे, असा टोला मिटकरींनी वडेट्टीवार यांना लगावला आहे. आगामी काळात आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही थेट जनतेसमोर जाणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, आमचे नेते अजित पवार यांचीही लवकरच बैठक होणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Politics over Pawar Meeting : 'गुप्त' भेटीत शरद पवारांना मंत्रीपदाची ऑफर? आघाडीतील सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता
  2. Supriya Sule on Meeting : नातं आणि राजकीय वैचारिकता वेगळी - सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती
  3. Raj Thackeray News: रस्ते करताना सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करा - राज ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.