ETV Bharat / state

'मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत'

author img

By

Published : Dec 6, 2020, 7:58 PM IST

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समर्पित केला आहे.

jayant patil
जयंत पाटील

मुंबई - विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे, हेच या निकालाने सिद्ध होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते? हेही या निकालाने दाखवून दिले असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया -

भाजपचा जो उन्माद होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. हे फक्त सरकारचं लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

हेही वाचा - संविधानासोबतच बाबासाहेबांचे देश उभारणीत मोठे योगदान - शरद पवार

सामनातूही भाजपला टोला -

विधान परिषद निवडणूक निकालात महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यानंतर सामनातून भाजपला डिवचण्याची संधी शिवसेनेने सोडली नाही. आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. असे चंद्रकांत पाटील म्हणतात. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. असे म्हणत शिवसेनेने भाजप आणि त्यातून चंद्रकांत पाटलांना टोला हाणला आहे.

पुणे, नागपूर आणि औरंगाबादेत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी-

पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड विजयी झाले आहेत. तर, औरंगाबाद मतदार संघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. सर्वात आश्चर्यकारक निकाल हा नागपूर मतदारसंघाचा लागला आहे. नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपा उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या ५८ वर्षापासून नागपुरात भाजपाचीच सत्ता होती. तब्बल ५८ वर्षांनी भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडली आहे. भाजपाने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत नागपूर मतदारसंघात त्यांचा पराभव होणे, हा सर्वात मोठा धक्का आहे.

हा भाजपचा नाही तर अमरिश पटेलांचा विजय-

धुळे व नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, हा भाजपचा नाही तर अमरीश पटेल यांचा विजय आहे. अमरीश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात गेलेले आहेत. हा त्यांचा विजय असल्याचे राज्याचे पाणीपुरवठ आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.