मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज संध्याकाळी ५ वाजता बैठक बोलावल्याचे स्पष्ट केले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आपल्याला अध्यक्षपदामध्ये स्वारस्य नसल्याचे पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले. पवारांच्या निर्णयानंतर ही बैठक होत आहे. मात्र, शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे बैठकीबाबत आपणच अधिकृत माहिती देऊ असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारच आहेत असे पटेल यांनी स्पष्ट केले. पक्षाचा अध्यक्ष सर्वसहमतीनेच होईल याची ग्वाही पटेल यांनी यावेळी दिली आहे. तसेच, आज सकाळपासून कुठलीही राष्ट्रवादी कोणतीही अधिकृत बैठक झाली नाही असे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.
अध्यक्ष होण्याच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले : यावेळी पटेल म्हणाले मी पक्षाचे अध्यक्षपद घेण्यासाठी तयार नाही. माझ्याकडे आधीपासून खूप काम आहेत. माझी अध्यक्ष होण्याची इच्छाही नाही असही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावेळी जरतर या प्रश्नाला काय उत्तर देणार असे म्हणत त्यांनी हा अध्यक्ष होण्याच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.
बैठकीचा निमंत्रक मी आहे त्यामुळे मीच : आज शरद पवार नेहमीप्रमाणे वाय. बी. चव्हाण सेंटरला आले. आज कोणतीही बैठक नव्हती. आज सर्व नेते पवारांना भेटण्यासाठी आले होते. शरद पवार यांनी अद्याप कोणताही निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा विचार केला नाही. ना आज कुठली बैठक झाली ना आज कुठला निर्णय झालेला आहे. अजूनही शरद पवार यांनी त्यांच्या मनात काय आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे कुठल्याही आफवा पसरवू नका असही पटेल यावेळी म्हणाले आहेत. शक्यतांवर चर्चा करू नका अशी विनंतीही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केली आहे. तसेच, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्तदेखील पटेल यांनी फेटाळून लावले आहे. बैठकीचा निमंत्रक मी आहे त्यामुळे मीच अधिकृत सांगू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोण असेल ? जाणून घ्या सविस्तर