मुंबई - ऱाज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आज दुपारी ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आज ईडी कार्यालयाला भेट देणार आहेत. मात्र या ईडीक़डून त्यांना आज कार्यालयास भेट देण्यास येऊ नका असे सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर ऱाष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या घराबाहेर गर्दी करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनय चौबे आणि पोलिसांचे एक पथक शरद पवार यांच्या निवास स्थानी दाखल झाले आहे.
शरद पवार आज ईडी कार्यालयाचा पाहूणचार घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना ईडी कार्यालय परिसरात न येण्याचे आव्हान केले असले तरी, राष्ट्रवादीचे नेते पवारांचा हा आदेश मानायला तयार नाहीत. आज राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत. यावेळी हे कार्यकर्ते शरद पवाराच्या समर्थनाथ मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मात्र या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होणार आहेत. तसेच पोलीस अधिकारी या ठिकाणी येतील त्यानंतर शरद पवारांशी चर्चा झाल्य़ानंतर पवार साहेब ईडी कार्यालयाकडे जाणार आहेत. तर नवाब मलिक म्हणाले, की भाजप ईडीचा गैरवापर करत आहेत. मात्र आज आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणारच आहोत. पवार साहेबांनी आम्हाला ईडी परिसरात यायला मज्जाव केला आहे. मात्र आम्ही ऐकणार नसल्याचेही मलिक म्हणाले.
भाजप सत्तेचा दुरपोयग करून दबाबतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेच्या हे लक्षात येत आहे. तसेच पोलिसांकडून आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली असल्याचेही मलिक म्हणाले. ही कारवाई योग्य नाही. तसेच पवार साहेब म्हणाले आहेत की आज ईडी कार्यालयात जायचे आहे. तर आज आम्ही जाणारच असल्याचेही मलिकांनी यावेळी सांगितले. दरम्यान पोलिसांनी आता या परिसरात १४४ नुसार जमावबंदी लागू केली आहे. आता या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाल्यास तणावाची परिस्थिती निर्माण होणार आहे.
भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती; भारताची लोकशाही धोक्यात-
शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांचा संबंध नसताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. कारण गेल्या १५ दिवसात पवारांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आहे. मात्र निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच ही कारवाई करणे लोकशाहीची गळचेपी आहे. कारण शरद पवारांचे नाव या प्रकरणात कुठेही नसतानाही कारवाई केली. त्यामुळे आमच्या तीव्र भावना असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.