ETV Bharat / state

Jitendra Awhad On The Kerala Story: द केरळ स्टोरीच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या - जितेंद्र आव्हाड - The Kerala Story

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून टीका केली आहे. केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.

NCP leader Jitendra Awhad
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : May 9, 2023, 11:11 AM IST

Updated : May 11, 2023, 10:20 AM IST

चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर - जितेंद्र आव्हाड

मुंबई : 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून वातावरण खूप तापलेले आहे. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ट्विट केले आहे.

Jitendra Awhad On The Kerala Story
केरळची आर्थिक स्थिती

महिला भगिनींची बदनामी : केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ती 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के आहे आणि उत्तरप्रदेशमध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे. त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की, ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालावा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची, असे ते म्हणाले. सिनेमाच्या निर्मात्याला भरचौकात फाशी द्यायला हवी, असेही त्यांनी उद्वेगाने म्हटले आहे. तसेच केरळ होयकोर्टाने मध्यस्ठी करून हा चित्रपट मध्येच थांबवायला हवा, असे ते म्हणाले आहेत.

केरळवर आधारीत चित्रपटाच खरे सत्य : आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत. त्यांना काही समजतच नाही, त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचे. शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत, असे चित्र उभे करायचे. हेच केरळवर आधारीत चित्रपटाच खरे सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा. त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावून, असे चित्रपट काढले जातात, असे ते म्हणाले. या चित्रपटाला भाजप नेते पाठिंबा देत आहेत, त्यावरूनही त्यांनी टिका केली. भाजप नेते म्हणत आहे, चित्रपट जावून बघा, काय बघायचं खोटं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून द केरळा स्टोरी चित्रपटावरून वातावरण तापले आहे. बरेच राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा जितेंद्र आव्हाडला इशारा - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे द केरळ स्टोरी’ चित्रपटाबाबत म्हणाले, की हा चित्रपट म्हणजे काही सत्यकथांवर आधारित जनजागृतीची मोहीम आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फाशीची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कुजलेल्या मनातील कुजलेल्या विचारांना फासावर लटकवण्याची गरज आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द केरळ स्टोरी चित्रपट पाहिल्यानंतर सांगितले. चित्रपटामुळे विध्वंसक सत्य, या चित्रपटाने आपल्या समोर आणले आहे. हा चित्रपट अनेकांचे डोळे उघडेल, असा त्यांनी दावा केला. आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, जर त्यांनी हे विधान केले असेल तर ते चुकीचे आहे. चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असा त्यांनी दावा केला.

किरीट सोमैय्या यांची राष्ट्रवादीवर टीका- जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित चित्रपटाच्या निर्मात्यांना फाशी द्यावी अशी मागणी केल्यानंतर आक्रमक झालेल्या किरीट सोमैय्या संतप्त झाले. सोमैय्या म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस लव्ह जिहादचे समर्थन करते का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या चित्रपटावर कोणीही बंदी घातली तरी आपण हा चित्रपट पुन्हा एकदा पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम मतांसाठी लव्ह जिहाद आणि दहशतवाद याचे राष्ट्रवादी समर्थन करणार का? हा माझा शरद पवार आणि महाविकास आघाडीला प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आहे.

असुद्दीन ओवैसींची मोदींवर टीका- मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. चित्रपटाचे प्रमोटर नाहीत, अशी खोचक टीका ' द केरला स्टोरी' चित्रपटावरून खासदार असदुद्दीन ओवैसींनी सोमवारी केली. या चित्रपटावरून त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली. मोदींनी माझ्यावर कितीही टिका केली तरी मला फरक पडत नाही, असेही ते म्हणाले. शिक्षणात अग्रेसर असलेल्या केरळमुळे देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळते. हे दाखविण्याऐवजी चित्रपटातून वेगेळेच काही दाखविले जात आहे, असे ते म्हणाले.

  1. हेही वाचा : Saamana Article News: गायब मुलींची धक्कादायक माहिती समोर, ठाकरे गटाची शाह-मोदींवर सडकून टीका
  2. हेही वाचा : Owaisi Criticized PM: नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, चित्रपटाचे प्रमोटर नाहीत- ओवैसींची 'द केरला स्टोरी' चित्रपटावरून टीका
  3. हेही वाचा :The Kerala Story News : द केरळ स्टोरीच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी पुरविली सुरक्षा

Last Updated : May 11, 2023, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.