मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ईडीकडे एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे. आयके आणि एफसी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने जयंत पाटील यांना समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलावले होते. ते आज हजर राहिले नाही. आयएल अॅण्ड एफएस म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अॅण्ड फायनाशिअल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस जारी केली आहे. या नोटीसनुसार, पाटील यांना आज 12 मे रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु जयंत पाटील हे चौकशीसाठी हजर राहण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
का गेले नाहीत चौकशीला : इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अॅण्ड फायनाशिअल सर्व्हिसेस कंपनीशी आपला काही संबंध नाही. त्यांच्याकडे मी कधीही कर्ज मागण्यासाठी गेलेलो नाही. आता नोटीस मिळाली आहे, तर आपण चौकशीसाठी जाणार आहोत असल्याचे पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या जवळच्या व्यक्तींचे लग्न आहेत. त्यामुळे आपल्याला दोन ते तीन दिवस चौकशीसाठी जाता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी ईडीला पत्र पाठवले आहे. दरम्यान ईडीची नोटीस का येते हे सर्व देशाला माहिती आहे, त्यामुळे नोटीस आली याचे मला आश्चर्य वाटले नसल्याचेही ते म्हणाले.
आयएल अॅण्ड एफएस काय आहे : आयएल अॅण्ड एफएस म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अॅण्ड फायनाशिअल सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतीय राज्य-अनुदानित पायाभूत सुविधा विकास आणि वित्त कंपनी आहे. याची स्थापना ही 1987 मध्ये आरबीआय नोंदणीकृत कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून तीन वित्तीय संस्थेने केली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त आणि कर्ज प्रदान करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान ईडीकडून आयएल आणि एफएस च्या व्यवहाराची चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती.
हेही वाचा : Sharad Pawar On ED Notice : ईडीच्या नोटिशीविरुद्ध राष्ट्रवादी कायदेशीर लढणार - शरद पवार