ETV Bharat / state

शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीतील चढउतार, एक दृष्टीक्षेप - शरद पवारांचा राजकीय प्रवास

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी पवार स्वत: मैदानात उतरलेत. परंतु याचदरम्यान त्यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे. यानिमित्ताने पाहुयात कसा होता पवारांचा राजकीय प्रवास....

शरद पवार
author img

By

Published : Sep 25, 2019, 4:47 PM IST

मुंबई - गेल्या ५० वर्षांपासून शरद पवार यांच्याभोवती महाराष्ट्रासह देशाचे राजकारण फिरत आहे. त्यांच्याएवढा राजकारणाचा अनुभव असणारा नेता सध्या तरी कोणी नाही. राजकीय पटलावरील डावपेचात माहिर असणारे पवार वयाच्या ८० व्या वर्षी देखील तरुणांप्रमाणे काम करताहेत. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी पवार स्वत: मैदानात उतरलेत. परंतु याचदरम्यान त्यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे. यानिमित्ताने पाहुयात कसा होता पवारांचा राजकीय प्रवास....

शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले. शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. गोविंदाराव हेदेखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यंकर्ते होते. तसेच त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळेच शरद पवार यांचा 'कॉलेज जीएस (जनरल सेक्रेटरी)ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री' हा खडतर प्रवास थक्क करणारा आहे.

बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतानाही त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस) म्हणून महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर नेतृत्त्व केले. या काळात शरद पवार यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला.

१९६७ ची निवडणूक मैलाचा दगड
१९६७ ची निवडणूक पवारांच्या कारर्किर्दीतील मैलाचा दगड मानली जाते. १९६७ मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी युवक काँग्रेसचे २७ वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतून विधानसभा लढण्याची ऑफर दिली. याला यशवंतराव चव्हाणही अनुकूल होते. परंतु मतदारसंघातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत पवारांच्या नावाला विरोध केला. मात्र, यशवंतरावांनी आग्रहामुळे पवारांनी तिकिट मिळाले आणि ते विजयी झाले.

१९७२ ला पवार प्रथम मंत्री
१९७२ च्या निवडणुकीत पवार पुन्हा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आले. त्यानंतर वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात ते प्रथम मंत्री झाले. १९७२ मध्ये पवारांवर गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपावण्यात आली.

१९७५ ला आणीबाणी अन् १९७८ ला राज्याला मिळाले सर्वात तरुण मुख्यमंत्री
२५ जून १९७५ ला देशभर आणिबाणी लागू करण्यात आली होती. १९७५ ते ७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती.

१९७७ ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये इंदिरा गांधीच्या विरोधकांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली. या निवडणुकीत इंदिरा गांधीचाही पराभव झाला. या निवडणुकीत जनता पक्षाचे सरकार आले आणि मोरराजी देसाई पंतप्रधान झाले. त्यानंतर दोन वर्षातच जनता सरकार गडगडले आणि पुन्हा केंद्रात इंदिरा गांधींचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर १९७८ मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळीही राज्यातील काँग्रसमध्ये दोन गट पडले. यामध्ये नासिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रसेचा एक गट होता. तर ब्रम्हानंद रेड्डी गटामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील शरद पवार हे होते. तर जनता पक्षामध्ये शेकाप, माकप, भाकप, रिपाई गट हे होते. या निवडुकीत जनता पक्षाला ९९, रेड्डी काँग्रेसला ६९, इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या. त्रिशंकु आवस्था झाल्याने दोन्ही काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. यामध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तर नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले.

अवघ्या ४ महिन्यातच शरद पवारांनी ४ मंत्र्यांसह ४० आमदार फोडले. रेड्डी काँग्रेसचे ३८ तर तर इंदिरा काँग्रेसचे ६ आमदार फोडले. त्यानंतर जनता पक्षाच्या पाठिंब्याने शरद पवार सर्वात कमी वयाचे (३८ वर्ष) मुख्यमंत्री झाले. तेव्हा वसंतदादा पाटलांनी शरद पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला होता.

१९८० ला पवारांचे सरकार बरखास्त
१९८० साली इंदिरा गांधींनी राज्यातले बिगर काँग्रेस सरकार बरखास्त केले. त्यानंतर १९८० साली राज्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रसचे सरकार सत्तेत येऊन बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे मुख्यमंत्री झाले.

१९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता. समाजवादी काँग्रेसच्या नेतृत्वखाली पवारांनी १९८५ ची विधानसभा निवडणुक लढवली. यामध्ये समाजवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले. पुढे १९८६ साली औरंगाबादमध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली शरद पवारांनी त्यांचा समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला.

१९८८ मध्ये पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
१९८८ नंतर पुन्हा पवारांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हालचाल करायला सुरुवात केली. जून १९८८ मध्ये पवार दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. त्यांच्या जागी पवारांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.

१९९० च्या निवडणुका
१९९० च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात सत्ता मिळाली. त्यानंतर तिसऱ्यांदा पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, १ वर्षानंतर पवारांना पुन्हा दिल्लीत बोलावण्यात आले. त्यांच्या जागी सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.

१९९१ मध्ये पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे, अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र, काँग्रेस संसदीय पक्षाने राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून १९९१ ला भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

२६ जून १९९१ प्रथमच पवार केंद्रीय मंत्री
२६ जून १९९१ रोजी पवारांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. नरसिंह रावांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.

१९९३ ला चौथ्यांदा मुख्यमंत्री
१९९३ ला बाबरी मशिद प्रकरणावरुन राज्यात असंतोष होता. अनेक ठिकाणी दंगली होत होत्या. राज्य सरकारवरी रोष वाढत होता. याचप्रकरणावरुन सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी पवारांच्या हाती पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. ६ मार्च १९९३ ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पवारांनी चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली. पवार मुख्यमंत्री धाल्यानंतर लगेच १२ मार्च १९९३ ला साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली. या स्फोटात २५७ जणांचा मृत्यू व ७१३ लोक गंभीर जखमी झाले होते. ही परिस्थिती पवारांनी यश्स्वीपणे सांभाळली. त्यानंतर १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला आणि शिवसेना-भाजप युती पहिल्यांदाच सत्तेत आले. मात्र, पवारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.

१९९८ ला विरोधी पक्षनेते
१९९६ ला शरद पवार लोकसभेवर निवडून गेले. १९९७ च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवार यांचा सीताराम केसरी यांनी दणदणीत पराभव केला. १९९८ ला पवारांनी लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले.

१९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना
मे १९९९ मध्ये पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पवारांसह पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर जून १९९९ मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

१९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

२००४ ते २०१४ देशाचे कृषीमंत्री
२०१४ साली देशात काँग्रेसचे सरकार आले. मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. सिंग यांच्या मंत्रीमंडळात शरद पवार यांच्यावर देशाचे कृषीमंत्री म्हणून जबाबदारी टाकण्यात आली. २००९ मध्ये पुन्हा काँग्रस आणि राष्ट्रवादीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आले. यावेळी पवारांवर कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्यांची धुरा देण्यात आली. २०१४ साली पवार हे राज्यसभेवर गेले. त्यानंतर त्यांनी जनतेतून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.