ETV Bharat / state

'देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणा, नाहीतर लोक धडा शिकवतील'

देशाची बिघडत चाललेली अर्थव्यवस्था सरकारने लवकर रुळावर आणावी अन्यथा जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवेदन काढून दिला आहे.

ncp chief sharad pawar on PM Narendra modi
author img

By

Published : Nov 6, 2019, 11:33 PM IST

मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी, वाहन उद्योग, लघुउद्योग आणि बांधकाम क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून देशाच्या विकास दरात (जीडीपी) मोठी घसरण झाली आहे. देशाची बिघडत चाललेली अर्थव्यवस्था सरकारने लवकर रुळावर आणावी अन्यथा जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवेदन काढून दिला.

बुधवारी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात देशाच्या आर्थिक स्थितीविषयी मोठी चिंता व्यक्त केली. पवार म्हणाले की, एनडीए सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या वर्षी (२०१५) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा दर ३९ टक्केवर गेला. त्यानंतर सहा वर्षात देशात १५००० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. नोटबंदीने सहकारी पतपुरवठा पद्धती कोसळली असून यंदा पहिल्या त्रैमासिक काळात कृषी विकास दर २ टक्के इतका निच्चांकी घसरल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - माझ्या मदतीने पुढे आलेल्यांनी पाठीत खंजिर खुपसला; आज 'ते'ही अडचणीत

सरकारच्या चुकीच्या धोरणाचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अवजड वाहनांच्या विक्रीत यंदा ३९ टक्के, दुचाकी विक्रीत २३ टक्के आणि स्कूटर विक्रीत १६ टक्के घट झाली. परिणामी ३ लाख लोकांचा रोजगार हिरावला गेल्याचा दावा पवार यांनी केला. चुकीच्या आर्थिक धोरणांचा लघुउद्योगांना मोठा फटका बसल्याचे ते म्हणाले. भिवंडी, मालेगाव येथील १० हजार पाॅवरलूम बंद पडले आहेत. तसेच मुंबईतील १ हजार कातडी उद्योग बंद झाले असून त्यातील १० हजार कामगार बेकार झाल्याचे ते म्हणाले. जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली असून देशातील सहा मेट्रो शहरातील घरविक्री ६० टक्क्यांनी घटल्याचा दावा पवार यांनी केला.

सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांकडे भांडवलाची चणचण असून त्यांचा एनपीए (बुडीत भांडवल) ४ लाख कोटींवर गेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या राखीव भांडवलातील १ लाख ७६ हजार कोटी रुपये घेऊनही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवलाची चणचण भासत असल्याचा दावा पवार यांनी केला. अर्थव्यवस्थेतील चुकीच्या धोरणांमुळे देशातील एक कोटी ५० लाख व्यक्तींनी रोजगार गमावले असून २०१५ मध्ये बेरोजगारीचा ५ टक्के असलेला दर २०१७ मध्ये १६ टक्क्यांवर गेला होता.

हेही वाचा - शिवसेनेचा चालेल, पण भाजपचा मुख्यमंत्री नको - हुसेन दलवाई

सीएमआयईच्या नोंदीनुसार देशातील सध्याचा बेराेजगारीचा दर ८.४ टक्के असून मेट्रो शहरातील बेरोजगारीचा दर ९.४ टक्के असल्याचे पवार म्हणाले. देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ मनमोहन सिंग आणि नोबल पारितोषिक प्राप्त अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मोदी सरकारला चुकीच्या आर्थिक धोरणांबाबत वेळोवेळी सावध केले होते, असे सांगून मोदी सरकारने यातून काही धडा नाही घेतला तर, जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा पवार यांनी दिला.

Intro:देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणा, नाहीतर लोक धडा शिकवतील ;शरद पवार यांचा मोदी सरकारला इशारा

mh-mum-01-ncp-sharadpavar-note-7201153

मुंबई, ता. ६ ;

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी, वाहन उद्योग, लघुउद्योग आणि बांधकाम क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला असून देशाच्या विकास दरात (जीडीपी) मोठी घसरण झाली आहे. देशाची बिघडत चाललेली अर्थव्यवस्था सरकार लवकर रुळावर आणावी अन्यथा जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्यासाठी पवार यांनी आज एक चार पानी टिपण काढून त्याची प्रत त्यांनी माध्यमांना दिली. त्यात हा इशारा दिला आहे.
बुधवारी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात देशाच्या आर्थिक स्थितीविषयी मोठी चिंता व्यक्त केली. पवार म्हणाले की, एनडीए सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या वर्षी (२०१५ ) शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा दर ३९ टक्केवर गेला. त्यानंतर सहा वर्षात देशात १५००० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. नोटबंदीने सहकारी पतपुरवठा पद्धती कोसळली असून यंदा पहिल्या त्रैमासिक काळात कृषी विकास दर २ टक्के इतका निच्चांकी घसरल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या चुकीच्या धोरणाचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अवजड वाहनांच्या विक्रीत यंदा ३९ टक्के, दुचाकी विक्रीत २३ टक्के आणि स्कूटर विक्रीत १६ टक्के घट झाली. परिणामी ३ लाख लोकांचा रोजगार हिरावले गेल्याचा दावा पवार यांनी केला. चुकीच्या आर्थिक धोरणांचा लघुउद्योगांना मोठा फटका बसल्याचे ते म्हणाले. भिवंडी, मालेगाव येथील १० हजार पाॅवरलुम बंद पडले आहेत. तसेच मुंबईतील १ हजार कातडी उद्योग बंद झाले असून त्यातील १० हजार कामगार बेकार झाल्याचे ते म्हणाले. जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली असून देशातील सहा मेट्रो शहरातील घरविक्री ६० टक्क्यांनी घटल्याचा दावा पवार यांनी केला.
सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांकडे भांडवलाची चणचण असून त्यांचा एनपीए (बुडीत भांडवल) ४ लाख कोटींवर गेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या राखीव भांडवलातील १ लाख ७६ हजार कोटी रुपये घेऊनही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवलाची चणचण भासत असल्याचा दावा पवार यांनी केला. अर्थव्यवस्थेतील चुकीच्या धोरणांमुळे देशातील एक कोटी ५० लाख व्यक्तींनी रोजगार गमावले असून २०१५ मध्ये बेरोजगारीचा ५ टक्के असलेला दर २०१७ मध्ये १६ टक्केवर गेला होता. सीएमआयईच्या नोंदीनुसार देशातील सध्याचा बेराेजगारीचा दर ८.४ टक्के असून मेट्रो शहरातील बेरोजगारीचा दर ९.४ टक्के असल्याचे पवार म्हणाले.देशाची माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ मनमोहन सिंग आणि नोबल पारितोषिक प्राप्त अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारला चुकीच्या आर्थिक धोरणांबाबत वेळोवेळी सावध केले होते, असे सांगून मोदी सरकारने यातून काही धडा नाही घेतला तर जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा पवार यांनी दिला.
Body:देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणा, नाहीतर लोक धडा शिकवतील ;शरद पवार यांचा मोदी सरकारला इशारा
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.