ETV Bharat / state

NCP chief Sharad Pawar तब्येत बिघडल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - ब्रीच कँडी रुग्णालय

शरद पवार यांनी तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. तरी त्यावर मात करत आपले आजवरचे राजकीय कार्यक्रम ( Sharad Pawar political news ) सुरुच ठेवलेले आहेत.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Oct 31, 2022, 12:50 PM IST

Updated : Oct 31, 2022, 1:02 PM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल ( Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital ) झाले आहेत. त्यांना २ नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ते शिर्डीमधील पक्षाच्या कार्यक्रमात ( NCP chief Sharad Pawar latest news ) ४ ते ५ नोव्हेंबरमध्ये सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसाचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट पत्र काढूनच शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नेमके शरद पवार यांच्यावर कोणत्या कारणास्तव उपचार दिले जाणार आहेत याबाबत अद्यापही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

पत्र
पत्र

शिर्डीतील शिबिरात ते उपस्थित राहतील पुढील तीन दिवस त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार होणार आहेत. तीन दिवसाचे उपचार घेतल्यानंतर ३ नोहेंबर तारखेला ते रुग्णालयातून घरी परत येतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आणि पाच नोव्हेंबरला होणाऱ्या शिर्डीतील शिबिरात ते उपस्थित राहतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

गतवर्षीदेखील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार गेल्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी कोणत्या कारणास्तव शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Last Updated : Oct 31, 2022, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.