ETV Bharat / state

War Against Drugs Campaign : ड्रग्ज पुरवठा साखळी तोडण्यासाठी एनसीबीची नवी शक्कल, दोन श्वान होणार पथकात सामील - Action of Mumbai police against drugs

आर्थिक राजधानी मुंबईत दररोज कोट्यवधींची ड्रग्ज पकडले जात ( Drugs worth crores seized in Mumbai ) आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( NCB ) 'वॉर अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम ( War Against Drugs Campaign ) सुरू केली आहे. एनसीबीच्या पथकात प्रथमच श्वान पथकाचा समावेश करण्यात येणार आहे.  श्वान पथकात समाविष्ट असलेले स्निफर डॉग्ज दुरूनच ड्रग्जचा वास घेऊन ओळखतील.

War Against Drugs Campaign
एनसीबी
author img

By

Published : Oct 19, 2022, 9:40 PM IST

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत दररोज कोट्यवधींची ड्रग्ज पकडले जात ( Drugs worth crores seized in Mumbai ) आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( NCB ) 'वॉर अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम ( War Against Drugs Campaign ) सुरू केली आहे. मुंबई पोलिसही ड्रग्जच्या विरोधात सातत्याने कारवाई करत ( Action of Mumbai police against drugs ) आहेत. असे असूनही ड्रग्जचा मुंबईत येण्याचा ट्रेंड काही थांबत नाही आहे. अशा स्थितीत चार महिन्यांपूर्वी मुंबईतील एनसीबीच्या झोनल डायरेक्टरचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित घावटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कुरिअरद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी एनसीबीने कंबर कसली आहे.

५० कोटींचे ड्रग्ज जप्त - मुंबई विभागीय युनिटने या सक्रिय असलेल्या सिंडिकेट्सचे पर्दाफाश करून परत मोठया प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीने तीन ठिकाणी कारवाई करून ५० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई येथील फॉरेन पोस्ट ऑफिसमधून कुरिअर पार्सलमधून 870 ग्रॅम हायड्रोपोनिक ड्रग्ज DRI अलीकडेच जप्त केले आहे. त्यामुळे अनेक राज्यांतून मुंबई फॉरेन पोस्टात येणाऱ्या पार्सलचे स्कॅनिंग करणं अवघड असल्याने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) कडून दोन स्निफर डॉग्स मुंबईत एनसीबीच्या पथकात सामील होणार आहेत.

एनसीबीच्या पथकात प्रथमच श्वान पथकाचा समावेश - पुढे घावटे यांनी सांगितले की, एनसीबी पोस्टल कुरिअर कर्मचाऱ्यांना ड्रग्जचे कुरिअर, पार्सल ओळखण्याचे प्रशिक्षण देत आहे. एनसीबी मुंबईसह महाराष्ट्राच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिका-यांना प्रशिक्षण देत आहे. एनसीबीच्या पथकात प्रथमच श्वान पथकाचा समावेश करण्यात येणार आहे. श्वान पथकात समाविष्ट असलेले स्निफर डॉग्ज दुरूनच ड्रग्जचा वास घेतील आणि ड्रग्ज ओळखतील. फॉरेन पोस्ट ऑफिस, कुरिअरमधून येणाऱ्या ड्रग्जचे पार्सल स्निफर डॉगद्वारे ओळखणे सोपे होईल. ड्रग्जच्या पार्सलमध्ये लपवून ठेवली जातात. अशा प्रकारे पाठविले जाणारे ड्रग्ज शोधणे सोपे नसून डॉग्स तात्कळ शोधू शकतील. आम्ही डॉग्सना बॉईज म्हणतो. हे दोन बॉईज लवकरच BSF कडून मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे ड्रग्ज पसरलेले पोस्ट आणि कुरिअर पार्सलमार्फतच जाळे नष्ट करण्यास एनसीबी प्रयत्नशील असणार असल्याची माहिती घावटे यांनी दिली आहे.

पथकात ७० श्वान असतील - अमली पदार्थांचे सेवन, तस्करीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत अमली पदार्थ श्वान पथकाची कल्पना मांडण्यात आली होती. ही संकल्पना एक अधिकाऱ्याने बैठकीत मांडली होती. या पथकात ७० कुत्रे असतील. हे देशातल्या एनसीबीच्या विविध विभागांमध्ये तैनात केले जातील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. अमली पदार्थ श्वान पथकाला विविध एजन्सी, राज्य सरकारांच्या ड्रग्ज युनिट्सना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्याचा उद्देश असेल.

श्वानांचा वापर खूप कमी प्रमाणात - सध्याच्या परिस्थितीमध्ये लपवण्यात आलेले अमली पदार्थ शोधण्यासाठी श्वानांचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो. त्याचप्रमाणे संस्थानिहाय याचे निकष वेगवेगळे असतात. काही ठिकाणी ड्रग ड्युटीसाठी श्वान तैनात करण्यासंदर्भात एखादी मानक कार्यप्रणालीदेखील नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितले. अमली पदार्थ श्वान पथकाचं लक्ष्य हे केंद्रीय निमलष्करी दल एनएसजीच्या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन त्यांना राज्य आणि एजन्सीजसाठी उपलब्ध करून देणं असं आहे. या उपक्रमातून अमली पदार्थ व्यसनाविरोधातल्या मोहिमेला चालना मिळेल.

ड्रग्जमुक्तीच्या मोहिमेत श्वानाची महत्त्वाची भूमिका - श्वान हा अतिशय हुशार प्राणी आहे. श्वानांची वास घेण्याची क्षमता अफाट असते. तसेच बुद्धिमत्ता, त्यांची निष्ठा ही त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ओळख देते. विशेष गोष्ट म्हणजे श्वानांची झोप फारच सावध असते. म्हणजे छोट्या आवाजाने देखील ते जागे होतात. म्हणून तर घराच्या रक्षणाची जबाबदारी कुत्र्यावर असते. खरं तर श्वानांमध्ये विविध गुण असतात. त्यांचा वैद्यकीय जगतातही उपयोग झाला आहे. आता ड्रग्जमुक्तीच्या मोहिमेतही श्वान महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.