मुंबई: नार्कोटीक कंट्रोल ब्युरो ( Narcotics Control Bureau) म्हणजेच एनसीपी मुंबईने आंतरराज्यीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. (Mumbai Crime) या दोघांकडून 4 किलो चरस जप्त करण्यात आले आहे. ( Mumbai NCB) जवळपास 8 लाखांचे हे चरस एनसीपी ने हस्तगत केले आहे.
एनसीपी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी माहिती देताना सांगितले की, दोन व्यक्तींना अटक करत NCB ला या प्रदेशात कार्यरत असलेल्या चरस सिंडिकेटवर प्रभावी कारवाई करण्यात यश आले आहे. या प्रयत्नातून 4 किलो उच्च दर्जाची चरस जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सक्रिय पुरवठ्यामध्ये सहभागी: नोडल ड्रग कायदा अंमलबजावणी एजन्सी इनपुटवर काम करत होती. ज्यामध्ये नेटवर्कने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून ड्रग्ज खरेदीसाठी कनेक्शन उघडकीस आले होते आणि संपूर्ण भारतातील विविध राज्यांना सक्रिय पुरवठ्यामध्ये सहभागी होते. गुप्त पाळत आणि माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक वितरकाकडे डिलिव्हरी करण्यासाठी वाहक ड्रग्जची खेप घेऊन मुंबईला येत असल्याची माहिती गोळा करण्यात आली. 27 डिसेंबरला वाहक आणि पुरवठादार एम. कुमार यांची ओळख पटली.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे पथक रवाना: जो ठाणे, महाराष्ट्राकडे जाणार्या ट्रेनमध्ये होता. तात्काळ एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे पथक ठाणे रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले आणि गाडी येण्याची वाट पाहिली. लवकरच, असे आढळून आले की, अयाज एसी नावाचा मुंबईतील रिसीव्हर ही खेप घेण्यासाठी ठाणे स्थानकाकडे जात आहे. त्यानुसार, वाहक आणि रिसीव्हर या दोघांना पकडण्यासाठी परिसरात पाळत ठेवण्यात आली होती आणि या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीना ताब्यात: मध्यरात्री ट्रेन येताच, सतर्क NCB अधिकार्यांनी माहिती तपशील आणि प्रोफाइलिंगच्या आधारे वाहक आणि पुरवठादाराची ओळख पटवली. वाहक आणि प्राप्तकर्ता या दोघांची ओळख पटवून घेतल्यानंतर आरोपीना ताब्यात घेतले.
4 किलो चरस असल्याचे उघडकीस: NCB टीमने तेथे जाऊन दोघांना रंगेहाथ पकडले. झडतीदरम्यान वाहकाच्या पिशवीतून तपकिरी टेपने गुंडाळलेली 16 पाकिटे जप्त करण्यात आली असून ती कापली असता काळे चिकट पदार्थ आढळून आले. त्यानंतर चौकशी केली असता तो चरस असल्याचे समोर आले. वजन केले असता एकूण चार किलो चरस असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी दिली.