मुंबई - देशात केंद्र सरकारने 'सीएए'चा कायदा समंत केल्यानंतर भाजपचे नेते फिरून जनतेचा पाठिंबा मागत आहेत. पण जनता या कायद्याला पाठिंबा देत नसल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. हा कायदा केंद्राचा आहे, यावर राज्यात प्रस्ताव आणून काही होणार नसल्याचे मलिक म्हणाले.
हा फोरम सीएएचा नाही हा कायदा केंद्राचा आहे. महाराष्ट्र विधानसभेचा या कायद्यासाठी वापर करणे चुकीचे आहे. सिडकोच्यामार्फत २ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप असा प्रस्ताव आणत असल्याचे मलिक म्हणाले.