मुंबई - आज (१ जुलै) राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे. मागील ३ महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध सैनिक बनून डॉक्टर्स लढत आहेत. डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी कलाकार निलेश चौहान यांनी आगळी वेगळी कलाकृती तयार करत त्यांना सलाम केला आहे.
दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता या व्हायरसविरुद्ध लढत आहेत. डॉक्टरांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गोष्ट नाही. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त निलेश यांनी डॉक्टरांच्या दररोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करत ही कलाकृती तयार केली आहे. मास्क, इंजेक्शन, सीरींज, स्टेथोस्कोप, सिजर, कॅप्सूल आदींचा वापर करत कलाकृती साकारण्यासाठी वापरला आहे. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागला.
राष्ट्रीय डॉक्टर दिन थोडक्यात
केंद्र सरकारने १९९१ ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन असतो. तर, अमेरिकेत ३० मार्च, क्युबामध्ये ३ डिसेंबर आणि इराणमध्ये २३ ऑगस्ट हा डॉक्टर दिन असतो.