मुंबई : नवीन शिक्षण धोरणामधील (NEP) नॅशनल क्रेडिट फ्रेम्स या संदर्भात शिक्षण संस्थांनी जागरूकपणे त्याचा प्रसार केला पाहिजे. त्यामुळे रोजगार क्षमतेमधील अडथळा दूर होईल. असे विधान केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आयआयटी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क कार्यशाळेमध्ये केले. आयआयटी मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क याबद्दलची महत्त्वाची कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती.
क्रेडिट फ्रेमवर्क : याप्रसंगी बोलताना श्रीमती अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, नवीन शिक्षण धोरण 2020 मध्ये ज्ञान, कौशल्ये आणि रोजगारक्षमता यांच्यातील अडथळे दूर करण्यासाठी क्रेडिट फ्रेमवर्कचे सार्वत्रिकीकरण करणे, सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी क्रेडिट जमा करणे आणि हस्तांतरण प्रणालीची स्थापना करणे हे शिक्षण आणि कौशल्याच्या मार्गांमध्ये अखंड गतिशीलता सुनिश्चित करण्यासाठी विचार केला आहे.
मंत्र्यांनी क्रेडिट फ्रेमवर्क आणि ज्ञानाचा संबंध जोडताना सांगितले की, राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क आम्हाला ज्ञान आणि कौशल्यांचे लागू पैलू ओळखण्याची संधी देईल. हे आजीवन शिक्षण आणि कौशल्यासाठी नवीन शक्यता देखील निर्माण करेल. राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क दरडोई उत्पादकतेला चालना देईल, सर्वांना सशक्त करेल आणि या शतकाचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा मजबूत पाया रचेल.