ETV Bharat / state

काँग्रेसने मध्यमवर्गाला स्वार्थी, लोभी ठरवून त्यांचा अपमान केला -मोदी - criticizes

मध्यमवर्गाच्या महानतेचे गोडवे गातानाच भाजप कशी मध्यम वर्गाचा सन्मान करते आणि काँग्रेस मात्र कशी मध्यमवर्गाला तुच्छ लेखते हे दाखवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Apr 27, 2019, 8:25 AM IST

मुंबई - मध्यमवर्गाच्या महानतेचे गोडवे गातानाच भाजप कशी मध्यम वर्गाचा सन्मान करते आणि काँग्रेस मात्र कशी मध्यमवर्गाला तुच्छ लेखते हे दाखवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस या मध्यमवर्गावरच ओझे टाकत आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. मोदी यांच्या ४५ मिनिटांच्या भाषणाचा भर मध्यमवर्गावर होता.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बिकेसी मैदानावर आयोजित सभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमवर्गाला जोरदार साद घातली. मध्यमवर्गामुळेच भारत विकसित झाला, असे सांगताना काँग्रेस मात्र मध्यमवर्गाला स्वार्थी, लोभी ठरवून त्यांचा अपमान करत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या न्याय योजनेचा थेट उल्लेख न करता ही योजना राबविण्यासाठी काँग्रेस मध्यम वर्गावरचे ओझे वाढवेल, अशी टीका त्यांनी केली.

मध्यमवर्गाने दिलेल्या आशीर्वादामुळे मी अभूतपूर्व काम करू शकलो. देशाच्या विकासात प्रामाणिक मध्यमवर्गाचे योगदान आहे. कर भरणारे आणि मध्यमवर्ग यांच्यामुळे देश निर्माण होत आहे. रक्तदान, नेत्रदान किंवा देहदान यातही मध्यमवर्ग आघाडीवर आहे. या मध्यमवर्गाला माझा सलाम, अशा शब्दांत मोदी यांनी मध्यमवर्गाला साद घातली.

एकीकडे भाजप मध्यमवर्गाचा सन्मान करत असताना काँग्रेस मात्र मध्यमवर्गाला स्वार्थी, लोभी म्हणून हिणवतेय. त्यांचा जाहीरनामा बघा. त्यात मध्यमवर्गाबद्दल काहीच नाही. काँग्रेस सत्तेत आले तर भ्रष्टाचार वाढतो. मध्यमवर्गावर कराचे ओझे आणि महागाई वाढते. या उलट आम्ही कर न वाढवता कर भरणाऱ्याची संख्या वाढवली. काँग्रेसच्या काळात महागाईची दरवाढ १० टक्क्यांवर होती आम्ही ती ४ टक्क्यांवर आणली, असेही मोदी म्हणाले.

Intro:Body:

pravin dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.