मुंबई : सांताक्रुज मध्ये 20 जानेवारीला कांदिवली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रुपेश नाईक दस्त घालताना वाकोला ब्रिजखाली एक व्यक्ती हातात काळी पिशवी घेऊन फिरत असताना संशयास्पद परिस्थितीत आढळला. पोलीस पथकास पाहून हा व्यक्ती पळून जात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या अंग झडतीत त्याच्याकडे 275 ग्राम हेरॉईन सापडले. तसेच घरात त्याने 50.1 ग्राम हेरॉईन लपवले असल्याचे देखील निदर्शनास आले. त्याचप्रमाणे चार लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या हिरोईनचे एकूण किंमत एक कोटी तीस लाख 4 हजार रुपये असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या पथकाने केली कारवाई : संबंधित व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीने इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन कुठून आणि कोणाला देण्यासाठी आणले याची चौकशी पोलीस करत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून तो एखाद्या टोळीचा भाग असल्याचे देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई सो. यांचे आदेशान्वये मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि. मुंबई यांचेकडून कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल: आरोपीला विश्वासात घेऊन केलेल्या अधिक चौकशीत त्याने आणखी अंमली पदार्थ त्याच्या राहत्या घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन १ कोटी ३० लाख ४ हजार रुपये किंमतीचे 'हेरॉईन' जप्त केले. आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कलम ८ (क) सह २१ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ प्रमाणे वाणिज्य स्वरुपाचा (Commercial Quantity ) गुन्हा नोंदविला. आरोपीची अधिक चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : Mumbai Crime : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली आजोबांची फसवणूक ; सह्या, अंगठे घेऊन बळकावले घर