ETV Bharat / state

राणेंच्या आत्मचरित्राचा मुहूर्त ठरला; वाचा, कधी आणि कोण करणार प्रकाशन?

खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला अखेर मुहूर्त मिळाला. येत्या १६ ऑगस्टला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. राणेंच्या आत्मचरित्रात काय काय उघड होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 13, 2019, 5:45 PM IST

Updated : Aug 13, 2019, 7:02 PM IST

मुंबई - बऱ्याच दिवसापासून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत असलेल्या खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला अखेर मुहूर्त मिळाला. येत्या १६ ऑगस्टला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. मराठीत 'झंझावात' तर इंग्रजीत "नो होल्ड बार" असे या आत्मचरित्राचे नाव आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती राहणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून राणे यांच्या आत्मचरित्र्याच्या प्रकाशनाबाबत चर्चा होत होती. राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आत्मचरित्राचे प्रकाशन करायचे होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना टाळले असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय सलोख्याचे संबंध दिसू लागले आहेत. हे दोन्ही नेते गेल्या तीन महिन्यात तीनदा एकाच मंचावर होते. यात शिवसेनेच्या वर्धापन दिनाचाही समावेश आहे. राणे यांच्या कार्यक्रमाला जाऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घेऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचेही चर्चिले जात आहे.

दरम्यान, राणे यांच्या या आत्मचरित्रात त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही लक्ष्य केले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी "नो होल्ड बार" या इंग्रजीतल्या आत्मचरित्राची पाने उघड झाली होती. यात उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करित 'राणे यांना पक्षातून काढा, अन्यथा मी मातोश्री सोडून जाईन', अशी धमकी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचा गौप्यस्फोट झाला होता. तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही मुख्यमंत्री पद गेल्याचा राग धरत माझ्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप राणे यांनी या पुस्तकात केला आहे.

अखेर खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्राला अखेर मुहूर्त मिळाला. येत्या १६ ऑगस्टला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. तसेच ज्या काँग्रेसमध्ये राणे यांनी दहा वर्ष काढली त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबाबतही राणे यांनी काय म्हटले आहे, याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Intro:अखेर ठरले ... पवारांच्या हस्ते राणेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन , गडकरीही राहणार उपस्तिथ

मुंबई १३

होणार होणार म्हणत लांबत चाललेल्या खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या १६ ऑगस्टला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे . मराठीत ' झंझावात ' तर इंग्रजीत " नो होल्ड बार " असे या आत्मचरित्राचे नाव आहे .

गेल्या तीन महिन्यापासून राणे यांच्या आत्मचरित्र्याच्या प्रकाशनाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत होती . राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन करायचे होते . मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना टाळले असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे . लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने घवघवीत यश मिळवल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय सलोख्याचे संबंध दिसू लागले आहेत . हे दोन्ही नेते गेल्या तीन महिन्यात तीनदा एकाच मंचावर दिसले असून यात शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा ही समावेश आहे . नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध पाहता , राणे यांच्या कार्यक्रमाला जाऊन उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घेऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे ही चर्चिले जातंय .

दरम्यान राणे यांच्या या आत्मचरित्रात त्यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सह सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष केले असल्याचे स्पष्ट होत आहे . काही दिवसं[पूर्वी " नो होल्ड बार " या इंग्रजीतल्या आत्मचरित्राची पाने उघड झाली होती . यात उद्धव ठाकरे यांना लक्ष करत असताना राणे यांना पक्षातून काढा अन्यथा मी मातोश्री हे घर सोडून जाईन अशी धमकी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचा गौप्यस्फोट झाला होता . तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ही मुख्यमंत्री पद गेल्याचा राग धरत माझ्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोपही ही राणे यांनी या पुस्तकात केला आहे .
या पुस्तकाचे प्रकाशन आता होत असून यात आणखी काय काय बाबी उघड होतात ,तसेच ज्या काँग्रेस मध्ये राणे यांनी दहा वर्ष काढली त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबाबत ही राणे यांनी काय म्हटलंय याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहेBody:...Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.