मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यात शिंदे फडणवीस सरकारला यश आले याच्या मागचं गमक नेमकं काय? त्यावर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. दरम्यान आज सामना या दैनिकातून नाना पटोले यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. याविषयी बोलताना माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वेगवेगळे खुलासे केले आहेत. तसेच, वळसे पाटील यांनी सरकारबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.
राजीनामा देताना चर्चा केली नाही : वळसे पाटील म्हणाले, आमच्यामध्ये (महाविकास आघाडी) आपसात मतभेद नाहीत. परंतु, ही गोष्ट खरी आहे की, नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते व त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर हे सरकार अस्तित्वात आलं नसतं. नाना पटोले यांच्या संदर्भात व्यक्तिगत मी काही बोलणार नाही. हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. परंतु, ते विधानसभा अध्यक्ष असते तर आज शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले नसते. विशेष म्हणजे त्यांनी राजीनामा देताना आघाडी सरकारबरोबर चर्चा करायला हवी होती व त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता, असेही वळसे पाटील म्हणाले आहेत.
देशातील एजन्सी यांची जिम्मेदारी वाढली : पीएफआयवर बंदी घालण्यात यावी ही मागणी वाढत आहे. याबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, अशी माहिती समोर आली आहे की, काही वर्षांनी हा देश इस्लामिक देश बनेल अशी माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातील एजन्सी यांची जिम्मेदारी वाढली असून, केंद्र सरकारने याबाबतीत हस्तक्षेप करायला हवा आणि कारवाई करायला हवी. भारतामध्ये अनेक समाजाचे लोक हसून-खेळून राहतात आणि जर कोणी अशा पद्धतीचा प्लॅन बनवत असेल तर तो कधीच पूर्ण होणार नाही. परंतु, केंद्र सरकारने यामध्ये तातडीने लक्ष देऊन योग्य कारवाई करणे उचित राहील असेही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर आपत्ती नको पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभराच्या अंतरामध्ये दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याविषयी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, पंतप्रधान जर मुंबई दौऱ्यावर येत असतील तर त्यावर कोणाला आपत्ती असण्याचे काही कारण नाही. मुंबईमध्ये त्यांचे स्वागत आहे. राजकारणात या सर्व गोष्टी होत असतात. म्हणून, त्यावर कोणी टिपण्णी करणे गरजेचे नाही. कधी कधी सरकारी काम असते, तर कधी पक्षाचे संघटनेचेसुद्धा काम असते. त्यामुळे त्यावर काहीही बोलने योग्य नाही असेही दिलीप वळसे पाटील यावेली म्हणाले आहेत.
हेही वाचा : शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास