मुंबई : Nana Patole News: महाराष्ट्रातील शिंदे सरकारला केंद्रातील हुकूमशाही सरकारची लागण झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मंत्रालयात दलालांना मुक्त (Mantralaya Entry) वापर करण्यास परवानगी तर सुरक्षेचे कारण देत सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश नाकारल्या जात असल्याच्या कारणावरून नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. (Maharashtra Politics)
सरकारवर साधला निशाणा : केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे. मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही, म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे. सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole On BJP)
पटोले यांचा राज्य सरकार व केंद्रावर निशाना : सामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटत नसल्याकारणाने ते मंत्रालयात येत असतात. मात्र आजपासून मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना प्रवेशासाठी कठोर नियमांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात काहींना मंत्रालयात प्रवेशदेखील नाकारले जात आहेत. तर नाना पटोले यांनी राज्य सरकारला हुकुमशाही सरकार म्हणत टीका केली आहे.
मंत्रालयात सामान्य जनता ही राजा : 2014 सालापासून केंद्रात हुकूमशाही व्यवस्था सुरू झाली असून तीच हुकूमशाही व्यवस्था आता राज्यात आली आहे. हजारो लोक आपल्या कामासाठी मंत्रालयात येत असतात. त्यांना मंत्रालयात येण्याची वेळच का येते? त्यात काही लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणी आत्महत्या करू नये अशा प्रकारची काँग्रेसची भूमिका आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जाते.
सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी जाचक अटी घालणे म्हणजे हुकूमशाही वृत्ती आहे. अशा प्रकारच्या जाचक अटी हटवून सामान्यांना मंत्रालायातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा. मंत्रालयात मंत्री , नेते राजा नसून सामान्य जनता ही राजा असल्याने त्यांचा सन्मान करावा-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
सरकारच्या दलालाचा भांडाफोड करणार : निर्मल भवन इमारतीमध्ये सरकारचा एक दलाल त्या ठिकाणी बसतो. जितके काही शासकीय कंत्राट आहे. ते त्या इमारतीतून वाटले जातात असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यातील जनतेच्या कामाच्या पैशाची लूट त्याला त्याच्या मार्फत होतो. लूट ही त्याला देशाच्या सत्ताधीश राज्याच्या सत्ताधीशाकडून आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारच्या या दलालाचा भांडाफोड काँग्रेस पक्ष लवकरच करणार असल्याचे नाना पाटोले म्हणाले आहेत.
जातीनिहाय जनगणना करा : 2014 पासून भारतीय जनता पक्षाने देशात जातीय तेड निर्माण करण्याचं काम केलं असून त्याचा आता काटेरी वृक्ष झाला आहे. भाजप कोणत्याही पक्षाला काहीच देणार नसून आश्वासन देणार असल्याचं नाना पटेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
हेही वाचा -
- Nana Patole On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्यास कोण जबाबदार? नाना पटोलेंनी थेटच सांगितलं...
- Nana Patole on Parliament Special session: संसदेचं विशेष अधिवेशन का बोलाविलं? नाना पटोले म्हणाले मोदी सरकारचा डाव...
- Muttemwar Criticized Gadkari Nagpur : फडणवीस आणि गडकरींनी शहराचा विकास नाही तर भकास केले; विलास मुत्तेमवार आणि नाना पटोलेंचा हल्लाबोल