ETV Bharat / state

१६४ वर्षांपूर्वीच्या तोफांचे पुनरज्जीवन, मुंबई महापालिकेचा उपक्रम - bmc

तब्बल १६४ वर्षे जुन्या आणि भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क'मध्ये आहेत. त्या तोफांना महापािलकेच्या वतीने नवीन झळाळी मिळणार आहे.

१६४ वर्षांपूर्वीच्या तोफांचे पुनरज्जीवन,

author img

By

Published : Mar 31, 2021, 5:14 PM IST

मुंबई - समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६४ वर्षे जुन्या आणि भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क'मध्ये आहेत. या तोफांना एक नवी झळाळी मिळावी, या दृष्टीने दोन्ही तोफा भव्य-दिव्य पद्धतीने पुन्हा स्थापित करण्याच्या प्रस्तावास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.

तोफांना नवी झळाळी
तोफांना नवी झळाळी
आता लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावरील 'लायन्स चिल्ड्रन पार्क' मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच तोफारुपी ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
महापालिकेचा उपक्रम
महापालिकेचा उपक्रम

हेही वाचा - बिग बॉस फेम एजाज खानला अटक, ड्रग्ज डिलर शादाब शेखशी मैत्री भोवली

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या घाटकोपर पूर्व परिसरातील 'लायन्स चिल्ड्रन पार्क' हे १९७१ पासून मुंबईकरांच्या सेवेत आहे. ५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाई सोबतच 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या काळातील दोन तोफा या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा आतील घेर हा ०.६४ मीटर आणि बाहेरील घेर १.१७ मीटर इतका आहे.

इंग्रज काळातील तोफा
इंग्रज काळातील तोफा

हेही वाचा - अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे मेहरबान

ऐतिहासिक तोफा
या दोन्ही तोफांवर १९५६ अशी नोंद असून एका बाजूला रोमन लिपी मध्ये 'एन सी पी सी' अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे १६४ वर्षे जुन्या असणार्‍या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या भव्य-दिव्य चबुतऱ्यावर पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंताकडे नुकताच पाठविला आहे. यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक ठेव्याला नवा‌ रुबाब प्राप्त होईल. मुंबईकरांना लवकरच ऐतिहासिक स्पर्श असलेले विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होईल.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.