मुंबई - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृत्तीया. अक्षय तृत्तीया भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण आहे. हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून खऱ्या अर्थाने आंबे खाण्यास सुरुवात केली जाते, अशी ही प्रथा आहे. या प्रथेनुसार दादरच्या शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरात देखील आंब्याची आरास करण्यात आली.
मागील ३ वर्षांपासून या मंदिरात बाप्पासाठी आंब्याची आरास केली जाते. त्याप्रमाणेच यावर्षीदेखील २ हजार १०० आंब्याची आरास करण्यात आली. हे आंबे उद्या भक्त आणि वेगवेगळ्या आश्रमांना वाटले जातात, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली.