मुंबई - मुंबईच्या मिठी नदीत सचिन वाझे याने डीव्हीआर लॅपटॉप,आणि सी.पी.यू. फेकल्याचे आज एनआयएच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना बोलले की, सचिन वाझे यांनी मनसुख हिरेण प्रकरणात जे कृत्य केले. ते जनतेसमोर उघडकीस आले आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त होता हे लवकरच कळेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांनी सचिन वाझेची बाजू घेऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि विधानभवनाची माफी मागावी, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
हेही वाचा - त्या दिवशी मनसुख हिरेनसोबत होते दोघे; एक हॉटेल व्यावसायिक, दुसरा पोलीस कॉन्स्टेबल
सचिन वाझेने नदीत टाकले डीव्हीआर, लॅपटॉप
मुंबई महापालिका प्रशासन गेले अनेक महिने मिठी नदी का साफ करत नाही असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. त्याचं उत्तर आज साऱ्या जनतेला मिळाले. मिठी नदी साफ केली तर, ही पापं जनतेसमोर येतील.आणि त्यांचे बिंग फुटेल म्हणूनच मिठी नदी साफ केली नव्हती अशी खोचक टीका लाड यांनी केली. मनसुख हिरेन हत्येच्या तपासासाठी एनआयएने डायव्हर्ससह स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेतली. सुमारे तीन तासांच्या शोधकार्यानंतर मिठीनदीच्या खाडीतून कॉम्प्युटरचे दोन सीपीयु, एकसारखेच रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या दोन नंबर प्लेट, एक हार्ड डिस्क ड्राइव्ह, दोन डीव्हीआर, एक लॅपटॉप, एक प्रिंटर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या.
हेही वाचा - .म्हणून सुप्रिया सुळे यांनी सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले