ETV Bharat / state

मुंबईत आता लायसन (परवाना) काढण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा - लायसन काढण्यासाठी प्रतीक्षा

राज्यातील 50 टक्के आरटीओ आणि डेप्युटी आरटीओ कार्यालयामध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास सांगितले आहे. तसेच लर्निंग आणि परमनंट अशा दोन्ही प्रकारचे लायसन्स काढण्यासाठी गर्दी होऊ नयेत, म्हणून आरटीओतील एकूण क्षमतेच्या फक्त 25 टक्के लायसन्स काढण्यासाठी आरटीओ मध्ये प्रवेश घेण्यास सांगितले आहे.

परिवहन कार्यालय
परिवहन कार्यालय
author img

By

Published : Apr 6, 2021, 9:04 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आजपासून (मंगळवार) 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेले आहेत. तसेच प्रत्येक आरटीओने 25 टक्के क्षमतेने शिकाऊ आणि पक्के लायसन्स काढण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

एकूण क्षमतेच्या फक्त 25 टक्के लायसन्स
याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने सोमवारी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार राज्यातील 50 टक्के आरटीओ आणि डेप्युटी आरटीओ कार्यालयामध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास सांगितले आहे. तसेच लर्निंग आणि परमनंट अशा दोन्ही प्रकारचे लायसन्स काढण्यासाठी गर्दी होऊ नयेत, म्हणून आरटीओतील एकूण क्षमतेच्या फक्त 25 टक्के लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले आहे. याशिवाय सर्व आरटीओमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तातडीने लसीकरणाची प्रक्रिया पार पाडावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

परिवहन आयुक्त
शिकाऊ वाहन चालकांना प्रतीक्षा कोरोनामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाजाला मोठा फटका बसलेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा कोरोना काळात आरटीओ कार्यालयाचे कामकाज मर्यादित स्वरूपातच सुरू होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने परिवहन विभागाला सर्व कामकाज करण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे लायसन्स मिळवण्यासाठी किंवा एकदाच शिकाऊ वाहन चालकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा-कथित 100 कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयने मागवली कागदपत्रे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.