ETV Bharat / state

Mumbai Pollution: वाहनांच्या प्रदूषणामुळे मुंबईत स्मॉगचे अच्छादन, महिला बालकांसाठी धोकादायक - बालक प्रदूषित वायूमुळे आजारी

Mumbai Pollution: जगभरात होणाऱ्या आधुनिकतेमुळे जरी आपण विकासाकडे वाटचाल करत असलो, तरी यामुळे निसर्गाची मोठी हानी होत असल्याचं समोर आलं आहे. मानवाच्या विकासामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होताना दिसत आहे.

Mumbai Pollution
Mumbai Pollution
author img

By

Published : Dec 9, 2022, 12:56 PM IST

मुंबई: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यात मुंबईपरासरातील हवामानाचा दर्जा अत्यंत खालावला आणि त्यामुळे माध्यमांमध्ये हवामानच्या दर्जा घसरल्याची नोंद घेतली गेली. मुंबईच्या हवेची गुणवत्ता 300 च्या पुढे गेलेली म्हणजे ही धोकादायक वळणाच्या दिशेने आहे .कोणत्या कारणामुळे हवामानाचा दर्जा घसरतो. काय परिणाम मानवावर होतो.एअर कॉलिटी इंडेक्स कोणत्या बदलामुळे घडतो परिणाम उपाय काय आहेत.

वाहनांच्या प्रदूषणामुळे मुंबईत स्मॉगचे अच्छादन

बालक प्रदूषित वायूमुळे आजारी: जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास जगात एकूण बालकांपैकी 90 टक्के बालक प्रदूषित वायूमुळे आजारी पडतात. नोव्हेंबरच्या महिन्याच्या अखेर मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स हा 200 आणि त्यापेक्षा पुढे होता.म्हणजेच धोकादायक दिशेकडे जाणारा होता. हवामान तज्ञ आणि वातावरण अभियांत्रिकी क्षेत्रातल्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार हे अत्यंत खराब हवामान आहे. तर जागतिक आरोग्य संघटना यांच्या अहवालानुसार जगातील एकूण बालकांपैकी 90 टक्के बालकांना दूषित हवामान खराब वातावरणामुळे टॉक्सिक ऍसिडचे मूलकण त्यांच्या शरीरात जातं आणि त्यामुळे विविध आजार त्यांना होतात असं म्हटलं आहे. मुंबईच्या आजूबाजूने तिन्ही दिशांनी समुद्रकिनारा आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्राधिकरण या हद्दीमध्ये समुद्र असल्यामुळे हवामान खराब व्हायला नको. त्याचं कारण समुद्रामुळे हवामानाच्या दाबाचा पट्टा असतो आणि आपली प्रदूषित झालेली हवा ती त्या ठिकाणी जाऊन हवेत विरून जाते. मात्र तसं नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात मुंबईत झालेलं नाहीये.ही बाब अलीकडे जास्त झाली म्हणून शास्त्रज्ञ अभ्यासक काळजी करत आहेत.

सर्वात खराब हवामानाची स्थिती: मुंबईमधील उपनगरांमध्ये पश्चिम उपनगरे विशेष करून एअर क्वालिटी इंडेक्स 300 आणि 300 च्या पुढे आहे .मालाड अंधेरी या ठिकाणी 300 च्या पलीकडे एअर क्वालिटी इंडेक्स आहे. तर बीकेसी ,वरळी या भागामध्ये 300 च्या आसपास आहे. फक्त नवी मुंबई मध्येच 300 पेक्षा कमी म्हणजे 200 आणि 300 च्या आत एअर क्वालिटी इंडेक्स आहे.मात्र समाधानकारक नाही.वाहतूक जिथे अधिक तिथे कार्बनडाय ऑक्साइड भरपूर म्हणजे आजाराला आमंत्रण दिले आहे.

मुंबईची हवेची गुणवत्ता घसरली: एअर क्वालिटी इंडेक्स बाबत आय आय टी आणि भारत सरकर वतीने सफर नावाचे एप विकसित केले आहे. त्यात रोजची हवेची गुणवत्ता आपल्याला समजू शकते.50 ते 100 AQI हा आकडा म्हणजे हिरव्या रंगाचा दर्शवलेला आहे तो अत्यंत चांगला आणि ते हवामान आरोग्याला पोषक असं आहे .असं वैज्ञानिकांनी संशोधनांती ठरवलेल आहे .पण शंभरच्या पुढे पिवळा रंग जो दर्शवलेला आहे. तो रंग म्हणजे थोड खराब थोडं चांगलं असं म्हणता येईल. पण त्यानंतर केशरी रंगाने दर्शवलेल्या हवामानाची गुणवत्ता 200 ते 300 AQI ही खराब आहे .आणि त्यासोबतच लाल रंगाची गुणवत्ताची दर्शवलेली होती.ती 300 ते 400 AQI निर्देशांक अत्यंत खराब आहे. आज आठ डिसेंबर 2022 रोजी मुंबईतील हवामान 300 वर कॉलिटी इंडेक्स पलीकडे गेलेला आहे . फक्त नवी मुंबईचे हवामान जे आहे ते 200 ते 300 या निर्देशांकामध्ये आहेत त्यामुळे ते थोडं ठीक आहे . मात्र मुंबईचे हवामान अत्यंत चिंताजनक आहे म्हणजेच हवामान तज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स का घसरतो: वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्था अर्थात प्रख्यात VJTI मुंबई येथील शास्त्रज्ञ प्रभाकर भावे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा त्यांचा संशोधनाचा विषय .त्यांनी ई टीव्ही भारत सोबत हवेच्या गुणवत्ता खराब होण्याचे कारण आणि त्याचे विश्लेषण मांडले. हवेची गुणवत्ता घसरते ज्याला आपण इंग्रजीमध्ये मोजमाप करण्यासाठी एअर कॉलिटी इंडेक्स या रीतीने पाहतो. मुंबई किंवा दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता हिवाळ्यामध्ये विशेषता घसरल्याचे आपण पाहतो. आणि हल्ली दिल्लीच्या पेक्षाही अधिक हवा खराब झाल्याचे मुंबईमध्ये देखील नोंद झालेली आहे.

कचऱ्यामुळे देखील वातावरणात प्रदूषण: हवेची गुणवत्ता घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रदूषण हे होय. आणि हे प्रदूषण मुख्यत्वे वाहतुकीमुळे होतं. ज्यामध्ये दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या धुरामुळे कार्बन डाय-ऑक्साइड हवेमध्ये प्रचंड प्रमाणात पोहोचतो .तसेच मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात बांधकाम प्रकल्प सुरू असल्यामुळे त्याची देखील धूळ ही पसरते. त्याचबरोबर काही प्रमाणात कचऱ्यामुळे देखील वातावरणात प्रदूषण होते. मात्र दुचाकी आणि चार चाकी मधून निघणाऱ्या धुरामुळे कारखाने मुळे प्रचंड प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड निघतो आणि तो हवेत जातो.साधारण 65 ते 70 टक्के प्रदूषण शहरातील ऑटोमोबाईलच्या निघणाऱ्या कार्बनडायओकसाईड मुळे हे होते. उन्हाळ्यामध्ये सूर्य भरपूर प्रमाणात असतो .त्यामुळे जे प्रदूषण होतं ते सूर्यामुळे हवेत विरून जातं प्रसरण पावतं आहे.

झाकणाच्या स्वरूपात काम: मात्र हिवाळ्यात तसं जास्त प्रमाणात होत नाही.करण सूर्य किरण प्रखर नसतात.शिवाय जमिनीपासून काही किलोमीटरच्या वरती वातावरणातील बदलामुळे आधीच एक हवेचा मोठा जाड थर तयार झालेला असतो. इकडे हा खाली प्रदूषित होऊन तयार झालेला वायू वरती जायला बघतो. तिकडे वरून हवेचा दाब असतो. आकाशात वरती आधीच एक जाड थर हवेचा तयार झालेला असतो तो झाकणाच्या स्वरूपात काम करतो. त्यामुळे आपण दुचाकी आणि चार चाक्यांमधून सोडलेला धूर आणि त्यातून तयार झालेला कार्बन डाय-ऑक्साइड आणि तो वायूमध्ये मिसळून तो वरती जाऊ शकत नाही. हवेत विरून जात नाही. परिणामी तो जमिनीपासून काही किलोमीटर अंतरावरच राहतो. त्याच्यामुळे आपण म्हणतो की हवेची गुणवत्ता घसरली. धुके उन्हामुळे विरून जाते.मात्र प्रदूषणामुळे तयार झालेले स्मोग पटकन विरत नाही.ते धोकादायक असते.उपाय म्हणाल तर डिझेल पेट्रोल गाड्या कमी प्रमाणात असाव्यात.नियमांचं पालन करणे. हवेची गुणवत्ता घसरल्याचा महिला, मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणारा परिणाम आहे.

डॉक्टरांचा निष्कर्ष: जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी जाहीर केलेले आहे की हवेतील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळे वातावरण प्रदूषण होते. आणि त्यामुळे एकूण बालकांच्या लोकसंख्येपैकी 90 टक्के बालके वेगवेगळ्या वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होतात. यासंदर्भात डॉक्टर शशिकांत शिंदे यांनी ईटीवी सोबत वैद्यकीय परिणामांबाबत चर्चा केली. ते म्हणतात की ,"हवेची गुणवत्ता घसरते मुख्यत्वे कार्बनडायऑक्साइड यामुळे. तो वातावरणात विरघळत नाही हिरवी वनराई हिरव्या झाडांचे प्रमाण कमी आहे.आणि प्रदूषण वाढल्यामुळे विशेष करून दहा वर्षाच्या आतील बालके गर्भवती महिला आणि म्हातारी माणसं यांना त्यांच्या फुफुसात श्वासावाटे खराब हवा शरीरात जाते. फुफुस त्यांचे कमजोर होतात. श्वसनाचे विकार जडतात आणि गर्भवती महिलांना देखील याचा त्रास होतो आणि त्यांच्या गर्भातील बाळाला देखील त्याचा त्रास होतो.यावर उपाय म्हणजे व्यायाम रोज करणे मात्र प्रदूषण कमी करणे हाच एकमेव उपाय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.